Violent Attack On Brazils Government: कुणी राष्ट्रपतींच्या खुर्चीत बसल आहे. कुणी टेबलावर घसरगुंडी खेळत आहे. कुणी काचा फोडत सुटलंय...आणि हे सगळं चाललंय...ब्राझिलच्या राष्ट्रपती भवनात... होय ब्राझिलमध्ये सध्या अनेकांनी अंदोलनाची पवित्रा घेतली आहे. झालं असं की, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांचा पराभव झाला होता. पण हा पराभव त्यांच्या इतक्या जिव्हारी लागला. की त्यांनी या सत्तांतरालाच नामंजूर केलं. तेव्हापासूनच बोल्सोनारो समर्थकांमध्ये असंतोष धुमसत होता.आणि अखेर तोच काल रस्त्यावर उतरला... माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांच्या 400 समर्थकांना अटक करण्यात आली आहे. 
 
हजारो समर्थकांनी आधी राष्ट्रपती भवनासमोर धरणं आंदोलन सुरु केलं. ब्राझिलचा राष्ट्रध्वज परिधान करुन सुमारे दहा हजार समर्थक एकवटले. आणि सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. सुरुवातीला सुरक्षा यंत्रणांना या जमावाला थोपवण्यात यश आलं. हेलिकॉप्टरद्वारे आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण आंदोलक इतके आक्रमक झाले, की त्यांनी सुरक्षारक्षकांनाच पळवून लावलं. आणि अखेर राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला
 
ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत लुला डा सिल्व्हा यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडणुकीत बोल्सोनारो यांचा पराभव झाला होता. आणि हाच पराभव त्यांच्या समर्थकांना मान्य नाहीये... राष्ट्रपतीपदावर बोल्सोनारो यांना बसवा, अशी त्यांची मागणी होती. अखेर 12 तासांच्या गतीरोधानंतर ब्राझिलियातल्या या राष्ट्रपती भवनाला आंदोलकांपासून मुक्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळालं आहे. आतापर्यंत 200 लोकांना अटक करण्यात आली आहे. गतीरोध संपला असला... तर असंतोष मात्र अजूनही धगधगतोय... 














अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांनी केली निंदा - 
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि परदेश मंत्री एँटनी ब्लिंकन यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपती भवन, काँग्रेस (संसद भवन) आणि  सुप्रीम कोर्टावर झालेल्या हल्ल्याची निंदा केली.  राष्ट्रपती बायडेन म्हणाले की, ब्राझिलच्या लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो.  ब्राझिलच्या लोकशाहीला आमचं पूर्णपणे समर्थन आहे.  






पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलियातील राज्य संस्थांविरोधात दंगल आणि तोडफोड झाल्याच्या बातम्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; "ब्राझिलियातील राज्य संस्थांविरुद्ध दंगल आणि तोडफोड झाल्याच्या बातम्यांबद्दल मनापासून चिंतित आहे. लोकशाही परंपरांचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा देतो.