Bus Accident in Senegal: सेनेगल देशात दोन बसेस यांची समोरसमोर धडक झाल्यामुळे तब्बल 40  जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर येथे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हा अपघात सेंट्रल सेनेगलच्या (Central Senegal) कॅफरीन येथील गनीबी (Gniby) गावाजवळ झाला आहे. 


सेनेगलचे राष्ट्रपती मॅकी सॉल  (President Macky Sall) यांनी  घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रपती मॅकी सॉल म्हणाले, गनीबी गावाजवळ झालेल्या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण अस्पष्ट असून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


तीन दिवसाचा दुखवटा जाहीर


राष्ट्रपतींनी सोमवारी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. तसेच रस्ते अपघात सुरक्षेविषयी लवकरच एका परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मॅकी सॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ते सुरक्षासाठीच्या ठोस उपाययोजनांसाठी 9 जानेवारीला बैठक होणार आहे. 






सेनेगल देशातील  पब्लिक ब्रॉडकास्टर  RTS ने दिलेल्या माहितीनुसार, दोन बसची समोरसमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाल आहे. सरकारी वकिल शेख डिएंग म्हणाले, हा अपघात नॅशनल रोड क्रमांत 1 वर झाला आहे. अपघातातील एका बसला टायर पंक्चर झाला होता आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसची समोरसमोर धडक झाली. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचा तपास पोलिस करत आहे. अपघातातील मृत नागरिकांची ओळख पटवणे सुरू आहे. घटनेची महिती मिळाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :