नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी मीडियाची भारतावर रोज आगपाखड सुरु आहे. त्यातच आज चीनच्या 'ग्लोबल टाईम्स'ने एक लेक प्रकाशित केला असून, यात भारत आणि चीनमध्ये तणावासाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याचं या लेखात म्हटलं आहे.


''डोकलाम परिसरात भारताकडून सातत्यानं सैन्य बळ वाढवण्यात येत आहे. त्यातच भारताचं नेतृत्व बिजिंग आणि वॉशिंग्टनमधील मतभेदाचा फायदा उचलत आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला थोपवण्यासाठी भारताकडून दोन्ही (अमेरिका आणि चीन) देशांमध्ये तणाव निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे, यात पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची आहे. वास्तविक, भारताच्या सद्य राजकीय परिस्थितीत भारतीय नेत्यांसाठी चीनसोबत चांगले संबंध ठेवणंच संयुक्तीक ठरणार असल्याचं,'' चिनी मीडियानं या लेखातून म्हटलंय.

''पंतप्रधान मोदी आपल्या या भूमिकेद्वारे संपूर्ण दक्षिण अशियात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. पण भारत आणि चीनचं (लष्करी)बळ पाहता, भारताला एकट्याला चीनशी दोन हात करणं शक्य नाही. त्यासाठी भारताला अमेरिका आणि जपानची मदत घ्यावी लागेल,'' अशी दर्पोक्ती चिनी मीडियानं दिली आहे.

विशेष म्हणजे, डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या ठिकऱ्या मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर फोडत, चिनी मीडियानं म्हटलंय की, ''पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतरच डोकलाम वाद सुरु झाला. वास्तविक, अमेरिकाला भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून, चीनला आव्हान देण्याची इच्छा आहे, आणि याचाच फायदा उचलत पंतप्रधान मोदी अमेरिकेशी राजकीय आणि सामरिक क्षेत्रात सहयोग वाढवण्यावर भरत देत आहेत,'' असंही या लेखात म्हटलंय.

दुसरीकडे डोकलाम मुद्द्यवर दोन्ही देशांनी समोरासमोर तोडगा काढावा, असं अमेरिकेनं गेल्याच आठवड्यात स्पष्ट केलंय. अमेरिकेचे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हीदर नौरेट म्हणाले की, ''दोन्ही देशांमधील तणावाच्या स्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांनी एकत्रित बसून, चर्चेद्वारे मार्ग काढावा अशी आमची अपेक्षा आहे. पण तूर्तास त्यावर भाष्य करणे योग्य नाही.''

दरम्यान, चीनने काल दोनवेळा लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्करामुळे चिनचे हे मनसुबे धुळीस मिळाले. चिनी लष्कराची घुसखोरी अपयशी झाल्यानंतर, चिनी लष्कराकडून काहीकाळ दगडफेकही करण्यात आली. पण भारतीय लष्कराकडूनही त्याला जशास तसे उत्तर देण्यात आले. त्यामुळे चिनी लष्कराला माघारी परतावं लागलं.

संबंधित बातम्या

लडाखमध्ये चीनचा घुसखोरीचा प्रयत्न, भारताचं चोख प्रत्युत्तर


डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!


भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’


युद्धासाठी तयार राहाचीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश


आमच्या लष्कराला हरवणं अशक्यचिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती


बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी


…तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया


चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी


G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र


चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर


सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा


…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी


हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात