वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिणाम भोगायला तयार राहा, असे उत्तर कोरियाचे लष्करशहा किम जोंग उन यांना सुनावले आहे. तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी न्यूजर्सीच्या बेडमिंस्टरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उत्तर कोरियाला इशारा दिला. ट्रम्प म्हणाले की, ''सध्या त्यांच्याकडून (किम जोंग) जाहीर धमक्या देण्याचं काम सुरु आहे. या धमक्यासोबत ते गुआम किंवा अमेरिकेच्या सहकारी देशांवर चढाई करण्याचा प्रयत्न करतील, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील.''
दुसरीकडे ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही किंम जोंग यांना इशारा दिला आहे. ''उत्तर कोरिया जर मूर्खपणाच्या कृती करेल, तर अण्वस्त्र संपन्न देश त्यांच्याविरोधात लष्करी बळ वापरण्यास मागे पुढे पाहणार नाही.''
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र परिक्षणचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यातच उत्तर कोरियाकडून अमेरिकेला सातत्यानं धमक्या देण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग यांनी, आपली अण्वस्त्रे अमेरिकेच्या टप्प्यात असल्याची उघड धमकीच दिली होती. यानंतर अमेरिका आणि उत्तर कोरियाकडून सातत्यानं वक्तव्यं सुरु आहेत.
दुसरीकडे युद्धाच्या शक्यतेमुळे उत्तर कोरियातील तब्बल 35 लाख लोकांनी सैन्यात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे, वृत्त तेथील सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. उत्तर कोरियातील लष्करात सध्या सव्वा लाख जवान असून, पावणे आठ लाख लोकांचे राखीव दलही त्या देशाकडे आहे.
मात्र, उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांच्या आधारे युद्धाची भाषा देण्यात असल्याने एवढ्या मोठ्या सैन्याची गरज काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2017 08:51 AM (IST)
उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिणाम भोगायला तयार राहा, असे उत्तर कोरियाचे लष्करशहा किम जोंग उन यांना सुनावले आहे. तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -