नवी दिल्ली: प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांच्या यादीतील विजेत्यांची नावं जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. यंदाचं शरीरविज्ञानशस्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचं नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना संयुक्तपणे जाहीर झालं आहे. कॅन्सर अर्थात कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. कॅन्सर थेरपीतील महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं.
जेम्स पी अलीसन यांनी प्रोटीनचा अभ्यास करुन रोगप्रतिकार प्रणालीबाबत महत्त्वाचं संशोधन केलं. अलीसन आणि तासुकू होन्जो यांनी अशी थेरपी विकसित केली आहे, ज्यामुळे शरिरातील पेशींमधील रोगप्रतिकारक प्रणालीला कॅन्सर ट्यूमरशी लढण्यासाठी सक्षम केलं जातं. कॅन्सर थेरपीबाबतच्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल या दोघांचा सन्मान करण्यात आला.
यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही अशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. गेल्या 70 वर्षात यंदा पहिल्यांदाच साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.
दुसरीकडे इतर क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोण पटकावणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र आणि शांततेचा नोबेल पुरस्कार कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
यंदा साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होणार नसल्याने सर्वांचं लक्ष शांततेच्या नोबेल पुरस्कारावर आहे. हा पुरस्कार शुक्रवारी ओस्लो इथं जाहीर होईल. मात्र त्यापूर्वी विज्ञानाशी संबंधित पुरस्कारांची घोषणा होईल.
कॅन्सर थेरपी विकसित करणाऱ्या संशोधकांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2018 04:12 PM (IST)
यंदाचं शरीरविज्ञानशस्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचं नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना संयुक्तपणे जाहीर झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -