एक्स्प्लोर

मसूद अझहरचा फास आवळला, पाकिस्तान सरकारकडून मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश, प्रवासबंदीही लागू

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता पाकिस्तान सरकारनं मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारनं तशी अधिसूचना जारी केली आहे.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर भोवती कारवाईचे फास आवळायला आता सुरुवात झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता पाकिस्तान सरकारनं मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारनं तशी अधिसूचना जारी केली आहे. इतकंच नाही तर मसूद अझहरवर प्रवासबंदीही लागू करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरु केले होते. मात्र चीनने नकाराधिकाराचा वापर करुन भारताच्या प्रयत्नात खोडा घातला होता. अखेर अमेरिका, फ्रान्स आणि यूकेच्या प्रस्तावाला चीनने पाठिंबा दिल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं. त्यामुळे मसूद विरोधात लावलेल्या निर्बंधाच्या अंमलबजावणीचे आदेश पाकिस्तानने आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मसूद अझहरला दुसरा मोठा झटका, पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित केल्यानंतर काल त्याला दुसरा मोठा झटका बसला. पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आदेशानंतर पाकिस्तानकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित केलं आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतची माहिती दिली होती. संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझहरचा समावेश केला आहे. पुलवाला हल्ला आणि भारतविरोधी अनेक कारवायामध्ये मसूद अझहरची महत्त्वाची भूमिका आहे. मसूद अझहरला चीनचं नेहमीच समर्थन मिळत होतं, मात्र यावेळी चीनने नरमाईची भूमिका घेतली. दहा वर्षांच्या प्रयत्नानंतर यश अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतावादी घोषित करण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून नुकतेच देण्यात आले होते. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठी भारतासह इतर काही देशांनी चारवेळा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा 2009 मध्ये भारतानेच प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने अमेरिका, इंग्लंड, फ्रांससह प्रस्ताव सादर केला होता. 2017 मध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रांस या देशांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. मार्च 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांनी पुन्हा एकदा प्रस्ताव सादर केला. अखेर आज मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांची परिणीती : भाजप दरम्यान, मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे, ही पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांची परिणीती आहे, असा दावा भाजपने केला आहे. पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीनं दहशतवाद्यांना आसरा मिळतोय, हे मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना सातत्यानं पटवून दिलं. त्यामुळे मोदींच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget