Somalia Attack : सोमालियामध्ये मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडली आहे. मुंबईतील ताज हॉटेलप्रमाणेच दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोदादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट केला. त्यानंतर दहशतवादी गोळीबार करत हॉटेलमध्ये शिरले.. हे सर्व दहशतवादी अल शबाब या संघटनेचेे असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झालाय.


सोमालियात (Somalia) मुंबई झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब (Al-Shabaab) या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोहादिशूमधील (Mogadishu) आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट केला. त्याचवेळी अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


वृत्तसंस्था एएफपीशी या घटनेबाबत बोलताना सुरक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं की, दहशतवादी अजूनही हॉटेल हयातमध्ये आहेत आणि सुरक्षा दलांशी चकमक सुरू आहे. ते म्हणाले की, हॉटेल हयातवरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर जिहादी गटाचे सैनिक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. हे बंदूकधारी हयात हॉटेलमध्ये घुसण्याच्या एक मिनिट आधी मोठा स्फोट झाला.


दोन सुरक्षा अधिकारी जखमी


तसेच, पोलीस मेजर हसन दाहीर यांनी सांगितलं की, सुरक्षा दल आणि जिहादी गटामध्ये झालेल्या चकमकीत मोहादिशूचे गुप्तचर प्रमुख मुहिद्दीन मोहम्मद यांच्यासह दोन सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. तसेच, घटनेच्या वेळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या स्फोटानंतर काही मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. या स्फोटांमुळे सुरक्षा दलाचे काही सदस्य आणि नागरिक जखमी झाले. एका व्यक्तीनं सांगितले की, या घटनेनंतर आसापासच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.


दहशतवादी गटानं यापूर्वीही केलेला हल्ला 


अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटानं या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. "अल-शबाबच्या हल्लेखोरांचा एक गट मोहादिशूमधील हॉटेल हयातमध्ये घुसला आहे आणि सध्या गोळीबार करत आहे," असं दहशतवादी गटानं त्याच्या समर्थक वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सोमालिया सरकारवर दहशतवादी संघटनेचा हा पहिला हल्ला नाही. याआधीही या दहशतवादी संघटनेनं अनेक भीषण स्फोट घडवले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :