एक्स्प्लोर

Afghanistan News: तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर काबीज केलं : रिपोर्ट

Afghanistan News: एएफपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर ताब्यात घेतले आहे.

Afghanistan News: तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर ताब्यात घेतले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा देशात आपले पाय पसरत आहे आणि त्याने अनेक क्षेत्रांवर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार सुरूच आहे.

यापूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी तालिबान्यांनी हल्ला करून अफगाण सरकारच्या राज्य मीडिया केंद्राच्या संचालकाची हत्या केली. अलीकडच्या काळात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येची ही ताजी घटना आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा काही दिवसांपूर्वीच देशाचे काळजीवाहू संरक्षण मंत्री यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता.

राज्य मीडिया सेंटरच्या संचालकाची हत्या अशा वेळी झाली जेव्हा तालिबान दिवसेंदिवस आपलं क्षेत्र वाढवत आहे. कारण अमेरिका आणि नाटो सैन्याने महिन्याच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेणार आहे. तालिबान अनेक महिन्यांपासून संपूर्ण अफगाणिस्तानात संघर्ष करत आहे आणि छोट्या छोट्या प्रशासकीय जिल्ह्यांचा ताबा घेतल्यानंतर आता प्रांतीय राजधानींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, तालिबानने शुक्रवारी दक्षिण निमरोज प्रांताची राजधानी झरंज ताब्यात घेतल्याचे दिसते. हा विजय प्रतिकात्मक असला तरी तो मोठा विजय मानला जात आहे. सरकारने दावा केला आहे की शहराच्या गंभीर पायाभूत सुविधांवर लढाई अजूनही सुरू आहे आणि झरंजचा ताबा अजून गेला नाही. परंतु, तालिबानने सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध केले आहेत, ज्यात तालिबान स्थानिक विमानतळावर आणि शहराच्या प्रवेश बिंदूंवर दिसत आहेत. या प्रांताचे गव्हर्नर अब्दुल करीम बरहवी यांनी झरंज येथून पळून जाऊन शांततापूर्ण चहर बुर्जक जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. जिथे त्यांना स्थानिक वांशिक बलोच लोकांनी संरक्षण दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget