तैपेई : उंच डोंगरकड्यांवर बिकीनी घालून फोटो घेणारी युवती गिगी वूचा दुर्दैवी मृत्यू झाला. तैवानमध्ये खोल दरीत कोसळल्यामुळे गिगीला प्राण गमवावे लागले. डोंगरमाथ्यावर बिकीनी घालून फोटोशूट करण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती.
36 वर्षांच्या गिगीने सोशल मीडियावर 'बिकीनी क्लाईम्बर' अशी ओळख मिळवली होती. पर्वतांच्या माथ्यावर बिकीनी घालून केलेल्या फोटोशूटमुळे गिगीला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली होती.
तैवानमधील युशान राष्ट्रीय उद्यानात शनिवारी फोटोशूट करताना तोल जाऊन ती दरीत कोसळली होती. अपघातानंतर तिने सॅटेलाईट फोनद्वारे मित्रांना आपल्याला दुखापत झाल्याची माहिती दिली होती. वाईट हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. अखेर सोमवारी तिचा निष्प्राण देह अधिकाऱ्यांना सापडला.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका भारतीय दाम्पत्याचा कॅलिफोर्नियात अशाचप्रकारे दु्र्दैवी अंत झाला होता. योसेमिते नॅशनल पार्कमध्ये सेल्फी घेताना हे सोशल मीडियावरील प्रसिद्ध जोडपं दरीत कोसळलं होतं.
डोंगरावर बिकीनी घालून फोटो काढणाऱ्या युवतीचा दरीत कोसळून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2019 11:48 PM (IST)
36 वर्षांच्या गिगी वूने सोशल मीडियावर 'बिकीनी क्लाईम्बर' अशी ओळख मिळवली होती. पर्वतांच्या माथ्यावर बिकीनी घालून केलेल्या फोटोशूटमुळे गिगीला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -