Swiss Bank : स्विस बँकेतून डेटा लीक झाल्यामुळे 1400 पाकिस्तानी नागरिकांची 600 खाती लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सने रविवारी ही माहिती दिली. स्वित्झर्लंडमध्ये रजिस्टर्ड गुंतवणूक बँकिंग फर्म, क्रेडिट सुईसकडून लीक झालेल्या डेटानुसार, खातेधारकांमध्ये माजी ISI प्रमुख जनरल अख्तर अब्दुर रहमान खान यांच्यासह अनेक प्रमुख राजकारणी आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. द न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनविरुद्ध लढणाऱ्या मुजाहिदीनांना मदत म्हणून अमेरिका आणि इतर देशांकडून अब्जावधी डॉलर्सची रोख आणि इतर मदत देण्यात आली होती. जी या बॅंकेच्या खात्यात जमा करण्यात आली होती.
रशियाशी लढणाऱ्या अफगाण मुजाहिद्दीनच्या सैनिकांना पुरवला निधी
डॉन वृत्तपत्राने ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीआरपी) चा रिपोर्ट देत म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये रशियाशी लढणाऱ्या मुजाहिदीन सैनिकांसाठी सौदी अरेबिया आणि अमेरिका, यूएस सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीच्या (सीआयए) स्विस बँक खात्यात पैसे पुरवण्यात आले. याच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, "या प्रक्रियेत पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस ग्रुपचाही (ISI) समावेश होता." द न्यूज इंटरनॅशनल वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, पाकिस्तानी खात्यांमध्ये सरासरी 4.42 दशलक्ष स्विस फ्रँक शिल्लक (रुपये) आहेत.
निवडणूक आयोगासमोर मालमत्तेची घोषणा नाही
पाकिस्तानी पब्लिकेशनने पुढे नमूद केलंय की, अनेक राजकीय व्यक्तींनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या त्यांच्या मालमत्तेच्या घोषणेमध्ये या खात्यांचा उल्लेख केलेला नाही.
येत्या काही दिवसांत आणखी गौप्यस्फोट
लीक झालेला नवा डेटा 2016 मधील तथाकथित पनामा पेपर्स, 2017 मधील पॅराडाईज पेपर्स आणि गेल्या वर्षीच्या पॅंडोरा पेपर्सचे अनुसरण करतात. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, जर्मन वृत्तपत्र व्हिसल-ब्लोअरने 18,000 पेक्षा जास्त बँक खात्यांवरील डेटा लीक केला, ज्याची एकूण रक्कम $100 अब्जपेक्षा जास्त आहे. येत्या काही दिवसांत आणखी गौप्यस्फोट अपेक्षित आहेत, कारण या लीकबद्दल अधिक तपशील सार्वजनिक होणार आहेत. यापूर्वी जानेवारीमध्ये, (CPI) नुसार भ्रष्टाचारीच्या यादीत 2021 मध्ये पाकिस्तान 180 पैकी 140 क्रमांकावर होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 16 स्थानांनी खाली आला होता.
- Nitesh Rane on Shiv sena : महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं आम्हालाही पाहायचंय; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पाहणीसाठी पालिकेचं पथक रवाना, अधिकारी काय पाहणी करणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha