नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने आज पहाटे पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय हवाई दलाच्या 12 'मिराज 2000' (वज्र)विमानांनी आज नियंत्रण रेषा ओलांडली. भारताच्या या लढाऊ विमानांच्या ताफ्याने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला.


या हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानच्या एफ16 विमानांचा ताफा भारताच्या ताफ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आकाशात झेपावला. परंतु भारतीय विमानांचा ताफा, भारताकडील स्फोटकांच्या साठा आणि मिराज 2000 विमानांची क्षमता पाहून पाकिस्तानची विमाने परत फिरली. मिराज 2000 या विमानांसह भारतीय वायू सेनेकडे खूप शक्तीशाली शस्त्रसाठा होता.
मिराजच्या हल्ल्यात तब्बल 200 अतिरेकी ठार | श्रीनगर | एबीपी माझा




एअर स्ट्राईकसाठी वापरण्यात आलेली सात शक्तीशाली शस्त्रास्त्रे

मिराज 2000 (वज्र): हवाई हल्ल्यासाठी भारताने मिराज 2000 विमानांचा वापर केला. कोणालाही संशय येऊ नये, एअर स्ट्राईकचा कोणालाही अंदाज येऊ नये, यासाठी देशभरातल्या 20 वेगवेगळ्या एअर बेसेसवरुन विमानांचं उड्डाण करण्यात आलं.

मॅट्रा मॅजिक क्लोज कॉम्बॅट मिसाइल : हल्ला करत असताना पाकिस्तानी हवाई दलाने आपल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानच्या विमानांना नेस्तनाबूत करण्यासाठी मिराज 2000 या लढाऊ विमानात 'मॅट्रा मॅजिक क्लोज कॉम्बॅट मिसाइल' आहे. या मिसाईलद्वारे शत्रुचे विमान हवेतच उडवता येते.

जीबीयू-12 (बॉम्ब) : हवाई दलाने जीबीयू-12 हे बॉम्ब दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर फेकले. 1000 किलो वजनाचे बॉम्ब अड्ड्यांवर फेकले गेले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कंट्रोल रुम, प्रशिक्षण केंद्रासह लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल या अतिरेकी संघटनेचे अड्डे उध्वस्त केले.

लाइटनिंग पॉड : धावते लक्ष्य भेदण्यासाठी, धावत्या लक्ष्यावर (गाडी, हेलिकॉप्टर, विमान)अचूक बॉम्ब फेकण्यासाठी या लेझर लाइटनिंग पॉडचा वापर करण्यात आला.

नेत्र एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग जेट : देशातील 20 एअर बेसेससरुन अनेक मिराज विमानांनी उड्डाण केले होते. त्यापैकी 12 विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली आणि ही विमाने पाकिस्तानमध्ये घुसली. या सर्व विमानांमध्ये समन्वय साधण्यासाठी 'नेत्र एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग जेट' हे अत्याधुनिक रडारने सुसज्ज असलेले विमान मदतीला होते. टार्गेटबाबतची संपूर्ण माहिती प्रत्येक मिराजमधील वैमानिकांना देण्यासाठी 'नेत्र'चा वापर करण्यात आला.

हेरॉन ड्रोन : मिराज विमानांमधील वैमानिकांच्या मदतीसाठी नियंत्रण रेषेच्या पलिकडे तिथली माहिती देता यावी, नियंत्रण रेषेची निगराणी करण्यासाठी पलिकडे होत असलेल्या हालचालींविषयी माहिती देण्यासाठी हेरॉन ड्रोनचा वापर करण्यात आला.

इल्यूशिन-78एम :पाकिस्तानमध्ये घुसलेल्या मिराज विमानांना इंधनाची आवश्यकता लागल्यास इंधन पुरवण्यासाठी इल्यूशिन-78एम या विमानाचा वापर करण्यात आला.

VIDEO