एक्स्प्लोर

Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तानातील भीषण बॉम्बस्फोटाची जबाबदारी ISISनं स्वीकारली

अफगाणिस्तानमधील कुंदुज येथील शिया मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. कुंदुजमधील मशिदीत झालेल्या स्फोटात किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

Afghanistan Bomb Blast:  अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्ष एकीकडे थांबायचं नाव घेत नसताना दहशतवादी कारवायांचं सावट देखील पिच्छा सोडायला तयार नाही. काल पुन्हा एकदा अफगाणिस्तान बॉम्बस्फोटानं हादरुन गेलं.  अफगाणिस्तानमधील कुंदुज येथील शिया मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला. कुंदुजमधील मशिदीत झालेल्या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बॉम्बस्फोटाची जबाबदारी दहशतवादी संघटना ISIS ने  स्वीकारली आहे. टेलिग्राम चॅनलवरुन ISIS ने असे सांगितले आहे की, 'कुंदुज शहरातील मशिदीमध्ये गर्दी असताना स्फोटक असलेले वस्त्र तिथे ठेवण्यात आले होते'.  ISIS ही संघटना तालिबानची कट्टर प्रतिस्पर्धी असून त्यांच्याकडून अफगाणिस्तानमध्ये सांप्रदायिक दंगे भडकवण्यासाठी शिया मुस्लिमांवर वारंवार हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. 

माहिती आणि संस्कृती उपमंत्री जबीउल्लाह मुजाहिद यांनी तुलू न्यूजला स्फोटाची पुष्टी केली होती. ते म्हणाले होते की "आज दुपारी कुंदुजच्या खानाबाद बंदर भागात एका शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आले. यात आपल्या देशातील अनेक लोक शहीद झाले आणि अनेक जखमी झाले.'

 हल्ल्यावेळी 300 पेक्षा जास्त लोक करत होते नमाज पठण 
स्फोट झाला तेव्हा 300 पेक्षा जास्त लोक मशिदीत नमाजसाठी जमले होते, असे स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तुलु न्यूजनुसार, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की या बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि जखमी झाले आहेत. मात्र अद्याप मृतकांचा निश्चित आकडा कळू शकलेला नाही.

Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तानच्या कुंदुझमध्ये शुक्रवारच्या नमाजदरम्यान मशिदीत बॉम्बस्फोट, किमान 50 जण ठार


अलीकडेच काबूलमधील मशिदीत स्फोट झाला होता
अलीकडेच काबूलमधील ईदगाह मशिदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोट करण्यात आला होता. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांच्या आईच्या स्मरणार्थ मशिदीत नमाज आयोजित करण्यात येत होती. मुजाहिदने नंतर ट्विट करून दावा केला की या हल्ल्यात अनेक नागरिक मारले गेले. तालिबानचे प्रवक्ते बिलाल कारी यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, या हल्ल्यात तालिबानी समर्थकांना कुठलीही इजा झाली नाही. हल्ल्यात मरण पावलेले नागरिक मशिदीच्या दाराबाहेर उभे होते, अशी माहिती देण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
Saudi Arabia Dammam Airport Aramco Oil Facility Attacked: सौदी अरेबियातील दम्माम विमानतळ आणि अरामको तेल प्रकल्पावर हल्ले; 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी, एका भारतीयाचाही समावेश
सौदी अरेबियातील दम्माम विमानतळ आणि अरामको तेल प्रकल्पावर हल्ले; 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी, एका भारतीयाचाही समावेश
स्वर्गाचं स्वप्न दाखवत 190 चिमुरड्यांना अन्नाविना तडफडून मारलं; धर्मगुरु दोषी, जंगलात तब्बल 400 हून अधिक मृतदेह सापडले
स्वर्गाचं स्वप्न दाखवत 190 चिमुरड्यांना अन्नाविना तडफडून मारलं; धर्मगुरु दोषी, जंगलात तब्बल 400 हून अधिक मृतदेह सापडले
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
Embed widget