Sudan Tribal Clashes : सुदान (Sudan) गेल्या काही दिवसांपानू आदिवासीयांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत 200 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये महिलांसह बालकांचाी समावेश आहे. आदिवासीच्या दोन गटांमध्ये वाद झाला. याचं रुपांतर संघर्षामध्ये झालं. 20 ऑक्टोबर रोजी या संघर्षाला सुरुवात झाली. दक्षिण सुदान येथील ब्लू नाईल प्रांतात (Blue Nile Province) दोन आदिवासी गटांमध्ये वाद सुरु झाला. या संघर्षात गेल्या आठवड्यात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रयत्न करूनही दोन्ही गट कोणत्याही किंमतीत हा संघर्ष संपवायला तयार नाहीत. ही लढाई अशीच सुरू राहिल्यास आणखी अनेकांना जीव गमवावा लागू शकतो, असे मानलं जात आहे.


याआधी झालेल्या संघर्षात 150 लोकांचा मृत्यू


सुदानच्या ब्लू नाईल प्रांतात गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या मते, ऑक्टोबरच्या सुरुवातीला अशाच हिंसाचारात 150 लोक मारले गेले होते, तर गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या संघर्षात 50 हून अधिक लोक आधीच मरण पावले आहेत. हा हिंसाचार थांबवण्यासाठी लष्कर आणि प्रशासनाचे लोक शर्थीचे प्रयत्न करत असले तरी हिंसाचार थांबलेला नाही.


या जातीय हिंसाचारात लहान मुले आणि महिलांना सर्वाधिक लक्ष्य केलं जात आहे. अहवालानुसार, हिंसाचारग्रस्त भागातून किमान 2000 लोकांनी स्थलांतर केलं आहे. संघर्ष कमी करण्यासाठी या भागात लष्कर तैनात करण्यात आलं आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात या भागात पुन्हा संघर्ष सुरू झाला. यामध्ये 13 जण ठार झाले.