एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तीन तासात 1400 एटीएममधून 900000000 ची चोरी
टोकियो : आंतरराष्ट्रीय पातळीवरील सराईत चोरांनी जपानच्या नाकी नऊ आणले आहेत. तीन तासांत 1400 एटीएममधून तब्बल 90 कोटी रुपयांची चोरी झाल्याचं वृत्त आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या चोरीमध्ये किमान शंभर जण सहभागी असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात यश आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या एका बँकेतून अवैधरित्या अकाऊण्ट डिटेल्स मिळवून बनावट कार्डाद्वारे पैसे काढण्यात आले.
15 मे रोजी सकाळी 5 ते 8 वाजण्याच्या सुमारास 1400 एटीएममधून पैसे काढण्यात आले. प्रत्येकाने सुमारे 1 लाख येन ( अंदाजे 61 हजार रुपये) काढले. जपानमध्ये एका एटीएममधून एकावेळी इतकीच रक्कम काढण्याची मर्यादा आहे. चोरांनी 1600 बनावट कार्डांचा वापर केला.
पोलिस याचा अधिक तपास करत असून विदेशी चोरांचा समावेश असल्यामुळे अडथळे येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement