मुंबई : सूर्यावर मोठा स्फोट (Sun Explosion) झाला आहे. आदित्य L-1 (Aditya L-1) आणि चांद्रयानच्या (Chandryaan) कॅमेऱ्यामध्ये सूर्यावर मोठा स्फोट झाल्याची घटना चित्रित झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे सूर्यावर पुन्हा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील महत्त्वाचा ग्रह आहे, त्यामुळे त्याचा इतर ग्रहांवर परिणाम होत असतो. आता सूर्यावर झालेल्या स्फोटामुळे नवं संकट येणार का, याचा पृथ्वीवर नेमका काय परिणाम होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.


सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट


अंतराळात सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचाली कॅमेऱ्यात चित्रात झाल्या आहेत. यामध्ये सर्यावरील स्फोट, वादळ, खूप उच्च तापमान आणि वाऱ्याच्या जोरदार प्रवाह स्पष्टपणे दिसत आहे. आदित्य L1 च्या एक्स-रे पेलोड सोलेक्सने अनेक X आणि M क्लास फ्लेअर्स देखील पाहिले जे L1 पॉइंटमधून दिसले. याच्या पेलोडमध्ये एक स्पेक्ट्रोमीटर आहे, जो सौर वाऱ्याचे ट्रेस कॅप्चर करतो.


दरम्यान, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. सूर्याच्या पृष्ठभागावर सौरवादळामुळे स्फोट होतात.  सौर स्फोट (Sun Explosion) किंवा सौरवादळ (Sun Strom) म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या सौर ज्वाळा (Sun Flare) तयार होतात. 


सौर ज्वाळा म्हणजे काय?


सोलर फ्लेअर म्हणजेच सौर ज्वाळा. सूर्यावरील चुंबकीय क्षेत्राचे तापमान वाढून पृष्ठभागावर स्फोट होतात. त्यामुळे नंतर सौर ज्वाळा उत्पन्न होतात.


सूर्यावर स्फोट का होतात? 


सोलर फ्लेअर्स हे सूर्याच्या वातावरणात निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे स्फोट आहेत. सौर ज्वाळा म्हणजे सूर्याच्या वातावरणातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे उत्सर्जन आहे. सोलर स्फोट सनस्पॉटच्या ठिकाणी होतात.


सनस्पॉट म्हणजे काय?


सूर्याच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक असते, तिथे गडद डाग तयार होतात. सनस्पॉट्स हे सूर्याच्या पृष्ठभागावरील तात्पुरते डाग आहेत. सनस्पॉट तयार झाल्यावर त्याच ठिकाणी स्फोट होतात. असे स्फोट सूर्यावर होत असतात.


सर्यावरील स्फोटांचा पृथ्वीवर काय परिणाम होणार?


सौर वादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर होणारे स्फोट. यामुळे तयार झाले चुंबकीय बल आणि सौरवादळे ताशीलाख किलोमीटर वेगाने वातावरणात पसरतात. अशी सौर वादळे अवकाशातील कण शोषून घेत पुढे सरकतात. ही सौरवादळे पृथ्वीवर आदळतात तेव्हा त्यांचा सॅटेलाईट नेटवर्क, टीव्ही, रेडिओ कम्युनिकेशन आणि जीपीएस प्रणाली यावर परिणाम होतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ADITYA-L1 : अभिमानास्पद! आता भारत सूर्याचा अभ्यास करणार, आदित्य एल 1 नियोजित ठिकाणी पोहचलं, इस्रोची यशस्वी झेप