Solomon Tsunami Warning: सोलोमन (Solomon) बेटांजवळ 7.3 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर (Earthquake) स्तुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यूएस जियोलॉजिकल सर्वेच्या अहवालानुसार, सोलोमन बेटांजवळ शक्तिशाली भूकंपानंतर स्तुनामीचा इशारा देण्यात आला आहे. 


यापूर्वी सोमवारी (21 नोव्हेंबर) इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भीषण भूकंपामुळे 46 जणांचा मृत्यू झाला होता. तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 एवढी होती. याआधी शुक्रवारीही इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी मोजली गेली होती. त्याची खोली भूगर्भात 20 किमी इतकी होती.


भूकंपामुळे इंडोनेशियामध्ये अनेक इमारतींचे नुकसान झालं आहे. भूकंपाच्या वेळी लोक रस्त्यावर आणि गल्ल्यांमध्ये जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. या भीषण भूकंपात अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


जावाच्या गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपातील मृतांची संख्या 162 वर पोहोचली आहे. तर, भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश मुलांचाच समावेश होता. भूकंप आला त्यावेळी मुलं शाळांमध्ये शिकत होती. भूगर्भशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जावाच्या सियांजूर भागात जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होता. भूकंपानंतर तिथे तब्बल 25 धक्के जाणवल्याची नोंद करण्यात आली आहे.  


भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रांतातील डोंगराळ भागांतील सियांजूर शहराजवळ होता. सोमवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्यानं लोक घाबरले आणि आपापल्या घरांतून बाहेर पडत मोकळ्या जागी एकत्र येऊ लागले. तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी इमारती कोसळल्या. सियांजूर येथील रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं. जखमींची संख्या इतकी जास्त होती की, रुग्णालयाच्या इमारतीच्या पार्किंगमध्येही रुग्णांवर उपचार करण्यात आले. एवढंच नाहीतर रस्त्यांवर तंबू उभारुन तिथेही भूकंपात जखमी झालेल्यांवर उपचार सुरु होते. 


भूकंपाच्या आधीही विध्वंस 


यापूर्वी शुक्रवारीही इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये भूकंप आला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी मोजली गेली. त्याची खोली भूगर्भात 20 किमी होती. विशेष बाब म्हणजे, इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे 270 दशलक्ष आहे आणि भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखीमुळे ते प्रभावित झाले होते. इंडोनेशियाला विनाशकारी भूकंपांचा इतिहास आहे. 2004 मध्ये, उत्तर इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर 9.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. इंडोनेशियासह 14 देशांना याचा फटका बसला होता. त्यावेळी हिंद महासागराच्या किनार्‍यावर 226000 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी बहुतेक इंडोनेशियाचे रहिवासी होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये भूकंपात आतापर्यंत 162 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू