Space Weather News : अंतराळ (Space) संशोधकांनी पृथ्वीवर सौर वादळ (Solar Storm) धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. अंतराळ हवामान संशोधक डॉ. तमिथा स्कोव (Dr. Tamitha Skov) यांनी पृथ्वीवर (Earth) मोठं सौर वादळ धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सौर वादळ (Solar Storm) धडकणार आहे. यामुळे सर्वच शास्त्रज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. 15 जुलै रोजी सूर्यावर ज्वालांचा स्फोट (Solar Flare Eruption) झाला असून यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेमुळे सौर वादळ तयार झालं आहे. हे सौर वादळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकण्याची शक्यता असून याचा परिणाम मोबाईल (Mobile), सॅटेलाइट (Satelite) आणि जीपीएस (GPS) सेवांवर होण्याची शक्यता आहे.


सूर्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळत आहेत. 15 जुलै रोजी सूर्यावर ज्वालांचा मोठा स्फोट झाला असून याचा परिणाम पृथ्वीवरही जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 19 जुलै रोजी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये एक छिद्र पडलं. यातून छिद्रातून सौर वादळ पृथ्वीवर आदळलं होतं. अंतराळ संशोधकांच्या मते, येत्या आठवड्यात सूर्याच्या पृथ्वीकडील पृष्ठभागावर सनस्पॉट दिसण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासनाने (NOAA - National Oceanic and Atmospheric Administration) पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याचा अंदाज वर्तवला आहे. 


मोबाईल (Mobile), जीपीएस (GPS) सेवांवर होणार परिणाम
र्याच्या पृथ्वीकडील पृष्ठभागावर सनस्पॉट तयार होण्याची शक्यता आहे. या सनस्पॉटमधून मोठ्या प्रमाणात आणि शक्तिशाली अशा सौर ज्वाळा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. यामुळे रेडिओ ब्लॅकआऊट होऊन याचा परिणाम मोबाईल (Mobile), जीपीएस (GPS) सेवांवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान शास्त्रज्ञांनी भूचुंबकीय वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. पृथ्वीवर सौर वादळ धडकल्यास याचा परिणाम मोबाईल (Mobile), सॅटेलाइट (Satelite) आणि जीपीएस (GPS) सेवांवर होण्याची शक्यता आहे. 


सनस्पॉट म्हणजे काय?


सनस्पॉट म्हणजे सूर्यप्रकाशातील गडद भाग. चुंबकत्वामुळे सूर्यावर जे गडद भाग (डाग किंवा ठिपका) (Sunspot) तयार होतो याला 'सनस्पॉट' असं म्हणतात. सनस्पॉट्स काही तासांपासून काही महिने टिकू शकतात. सर्व सनस्पॉट्समुळे सौर ज्वाला तयार होत नाहीत, मात्र याचा पृथ्वीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.


सौर वादळ म्हणजे काय?


सौर वादळ थेट सूर्यमालेशी आणि सूर्याशी संबंधित आहे. सौर वादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या ज्वाळा तयार होतात. सूर्यावर होणारे स्फोट अणुबॉम्बइतके शक्तिशाली असू शकतात, यावरून तुम्ही या धोकादायकचा अंदाज लावू शकता. जेव्हा सूर्यावरील वायूंच्या घर्षण होऊन स्फोट होतात, तेव्हा त्यातून ज्वाला बाहेर पडतात, याला सौर ज्वाळा म्हणतात. या ज्वाळानंतर ते पृथ्वीच्या तसेच सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या दिशेने जातात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :