एक्स्प्लोर

फ्लोरिडात माजी विद्यार्थ्याच्या गोळीबारात 17 चिमुरडे मृत्युमुखी

फ्लोरिडातील पार्कलँड परिसरात असलेल्या स्टोनमन डग्लास हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.

फ्लोरिडा : शाळेतील गोळीबाराच्या घटनेमुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. फ्लोरिडात माजी विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 17 निष्पाप चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी 19 वर्षीय आरोपी निकोलस क्रूझला अटक करण्यात आली आहे. फ्लोरिडातील पार्कलँड परिसरात असलेल्या स्टोनमन डग्लास हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. गैरवर्तनामुळे निकोलस क्रूझला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याच रागातून त्याने शाळेत घुसून गोळीबार केल्याची माहिती आहे. आरोपी निकोलसने सुरुवातीला फायर अलार्म वाजवला. त्यामुळे आग लागल्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची पळापळ झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याने अंदाधुंद गोळीबार केला. आरोपीने गॅस मास्क लावला होता आणि त्याच्याकडे स्मोक ग्रेनेड होते, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शिताफीने पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं. शाळेत गोळीबार होत असल्याचं समजताच विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपण 19 विद्यार्थ्यांना कपाटात लपवल्याचं एका शिक्षिकेने सांगितलं. स्टोनमन डग्लास हायस्कूलमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकन विद्यार्थीही शिकत असल्याची माहिती आहे. त्यापैकी एक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मयत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फ्लोरिडा सरकारने ध्वज अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं आहे. स्टोनमन डग्लास हायस्कूल आठवड्याभरासाठी बंद ठेवण्यात आली आहे. अमेरिकेत यापूर्वीही शाळा-महाविद्यालयांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. 'टाइम'च्या माहितीनुसार 2018 मध्ये शाळेत झालेल्या गोळीबाराची ही 18 वी घटना आहे. अवघ्या दीड महिन्यातच गोळीबाराच्या 18 घटना घडल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हाती बंदुका पडत असल्याबद्दल राष्ट्राध्यक्षपदी असताना बराक ओबामांनी चिंता व्यक्त केली होती. गेल्या वर्षी लास वेगासमध्ये झालेल्या गोळीबारात 58 जणांना प्राण गमवावे लागले होते. तर 2016 मध्ये ओरलँडोत असलेल्या नाईट क्लबमधील गोळीबारात 49 जण मृत्युमुखी पडले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget