America Taiwan Missiles Deal : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या प्रशासनाने अमेरिका (America) आणि तैवान (Taiwan) यांच्यातील 100 कोटी डॉलर्सच्या क्षेपणास्त्र कराराला (missiles) मंजुरी दिली आहे. चीनचा (china) वाढता दबाव पाहता तैवानची क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा मजबूत करणे हा या क्षेपणास्त्र कराराचा (missile deal) उद्देश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी करून या क्षेपणास्त्र कराराला मंजुरी दिल्याची माहिती दिली.



चीनची तैवानबाबतची भूमिका होणार कठोर
चीनची राजधानी बीजिंग येथे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा (winter olympic) होत आहे, त्यामुळे देशात राष्ट्रवादाची भावना शिगेला पोहोचली आहे. खेळ संपल्यानंतर चीनची तैवानबाबतची भूमिका आणखी कठोर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
चीन तैवानला आपला भाग मानतो आणि त्याला आपल्या अधिकारक्षेत्रात आणण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारत नाही. अलीकडच्या काही काळात चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीतून उड्डाण केले.
 


चीनकडून करार रद्द करण्याची मागणी 
तैवानला अमेरिकेकडून कोणत्याही शस्त्रास्त्र विक्रीवर चीनने तीव्र टीका केली आहे. चीनने अमेरिकेला हा करार रद्द करण्याची तसेच तैवानशी लष्करी चर्चा थांबवण्याचे आवाहन केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, "तैवानला अमेरिकेची शस्त्रे विक्री ही चीनच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षा हितांना गंभीरपणे हानी पोहोचते." 


तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेचे आभार मानले
हा करार तैवानला सध्याची हवाई-संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि तैवानला अमेरिकेकडून मिळत असलेली प्रगत अमेरिकन क्षेपणास्त्रे तैनात करण्यात मदत करण्यासाठी आहे. या कराराला मान्यता दिल्याबद्दल तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेचे आभार मानले आहेत.


 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha