Coronavirus Updates : कोरोना महासाथीची भीती अद्यापही कमी झाली नाही. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर, कोरोनापासून वाचण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यास सांगितले जात आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी एन95, केएन95  मास्क संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या संसर्दजन्य आजार नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक केंद्राने (सीडीसी) ही माहिती दिली. 


सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, एन95, आणि केएन95 मास्कशिवाय सर्जिकल मास्कदेखील संसर्गजन्य आजारापासून चांगली सुरक्षा देतात. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 'सीडीसी'ने म्हटले की, सर्जिकल मास्क पॉझिटिव्हिटीची शक्यता 66 टक्क्यांनी कमी करतात. परंतु N95 आणि KN95 मास्कमुळे संसर्गाचा धोका 83 टक्क्यांनी कमी होतो. या मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केला जातो.


मास्क वापराचे फायदे


कापडी मास्क घातल्याने संसर्गाचा धोका हा 56 टक्क्यांनी कमी होत असल्याचे आढळून आले. सीडीसीने म्हटले की, सर्वसामान्य लोकांमध्ये SARS-CoV-2 संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी नियमितपणे मास्क किंवा रेस्पिरेटर वापरण्याचे महत्त्व या आकडेवारीवरून दिसून येते. हे संशोधन कॅलिफोर्नियाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 18 फेब्रुवारी ते 1 डिसेंबर 2021 दरम्यान केले होते. या दरम्यान ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट आढळला नव्हता. मास्कचा वापर केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचेही या संशोधनात म्हटले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha