Saudi Arabia Bans Tablighi Jamaat:  सौदी अरेबियाने सुन्नी मुस्लिमांमधील सर्वात मोठी संघटना तबलिगी जमातीवर बंदी घातली आहे. सौदी अरेबिया सरकारने या संघटनेला दहशतवादाचे प्रवेशद्वा असल्याचे म्हटले. जगाभरातील मुस्लिमांच्या हितांचे संरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या सौदी अरेबियाच्या निर्णयामुळे तबलिगी जमात संघटनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 


सौदी अरेबियाच्या इस्लामिक मंत्रालयाने मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर तबलिगमध्ये सहभागी होण्याबाबत इशारा दिला. देशात इस्लामिक संबंधाबाबतचे मंत्र्याने या सुन्नी इस्लामिक संघटनेला दहशतवादाच्या प्रवेशद्वारापैकी असल्याचे म्हणत बंदीची घोषणा केली. तबलिगी जमात संघटना समाजासाठी धोका असल्याचे त्यांनी म्हटले. 


इस्लामिक बाबतचे मंत्री डॉ. अब्दुलल्लातिफ अल शेख यांनी मशिदींना आणि मौलवींना शुक्रवारच्या नमाजादरम्यान तबलिगी संघटनेत सहभागी न होण्याचे आवाहन करण्याचे निर्देश दिले होते. या गटामुळे ब्रेनवॉश होण्याचा धोका असून दहशतवादाचे एक प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या संघटनेटच्या प्रमुख चुका लोकांसमोर आणण्याचे निर्देश मौलवींना देण्यात आले होते. ही संघटना समाजासाठी धोकादायक असून तबलिगीसह इतर पक्षपाती गटांशी संबंध ठेवणे बेकायदेशीर आहे, हे लोकांना सांगण्याचे निर्देश देण्यात आले. 


तबलिगी जमात म्हणजे काय?


तबलिगी जमात सुमारे 100 वर्षांपूर्वी देवबंदी इस्लामिक विद्वान मौलाना मोहम्मद इलियास कांधलवी यांनी धार्मिक सुधारणा चळवळ म्हणून सुरू केली होती. तबलिगी जमातचे काम विशेषत: इस्लामच्या अनुयायांना धार्मिक प्रवचन देणे हे आहे. पूर्णपणे गैर-राजकीय, इस्लामची पाच मूलभूत तत्त्वे सांगणे हा या जमातचा उद्देश आहे: कलमा, नमाज, इल्म-ओ-जिक्र (ज्ञान), इक्रम-ए-मुस्लिम (मुस्लिमांचा आदर), इखलास-एन यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेषित मुहम्मद.- नियत (इरादाचा अधिकार असणे) आणि तफ्रिग-ए-वक्त (मेजवानी आणि तबलीगसाठी वेळ काढणे) उपदेश करणे आवश्यक आहे. जगभरात एक प्रभावी आध्यात्मिक चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमातचे कार्य आता पाकिस्तान आणि बांगलादेशातील गटबाजीचे बळी ठरले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: