America Cyclone Update : अमेरिकेला (America) चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 100 जणांना जीव गमवावा लागला आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा केंटकी भागाला बसला आहे. येथे अनेक इमारती कोसळल्या आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. ताशी 320 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अमेरिकेतील 6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अमेरिकेच्या केंटकी राज्यात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेफिल्डसह अनेक भागात चक्रीवादळामुळे सुमारे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, मेफिल्ड परिसरातील मेणबत्ती कारखान्याला वादळामुळे मोठा फटका बसला आहे. मेणबत्ती कारखान्याला वादळाचा तडाखा बसला तेव्हा शेकडो कामगार कारखान्यात काम करत होते.

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे चक्रीवादळचक्रीवादळामुळे अनेक इमारती कोसळल्या असून अनेक घरे उडाली आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक भागात बचावकार्य सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे वादळ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे वादळ असल्याचे म्हटले आहे. गव्हर्नर अँडी बेशियर यांनी केंटकीमध्ये वादळाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी जाहीर केली आहे. 

केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी हे चक्रीवादळ इतिहासातील सर्वात भीषण वादळ असल्याचे म्हटले असून राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची शक्यता असून मृतांचा आकडा 100 च्या वर जाण्‍याची भीती आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केंटकीमधील 2 लाखांहून अधिक घरांमध्ये वीज गेली आहे. वादळात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha