Omicron : नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा (Omicron) पहिला रूग्ण सापडून आता जवळपास दोन आठवडे उलटून गेले आहेत. ओमायक्रॉन आता दक्षिण आफ्रिकेपूरता मर्यादित न राहता तो संपूर्ण जगभर भयानक वेगाने पसरला आहे. आता पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील डेटावरून हा विषाणू अत्यंत वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. परंतु, दिलासादायक एक बाब म्हणजे त्याची लक्षणे फारशी गंभीर नाहीत.  


देशात या आधी आलेल्या कोरोनाच्या दोन लाटानंतर आता ओमायक्रॉनच्या रुपात तिसरी लाट येते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतलं मृत्यूतांडव सगळ्यांनी अनुभवलंय. त्यामुळे नुकत्याच भारतात शिरकाव केलेल्या ओमायक्रॉनबद्दल नागरिकांच्या मनात भीतीसोबतच अनेक प्रश्नही आहेत. पण सगळ्या भीतीच्या छायेत ओमायक्रॉनबद्दल काहीशी दिलासादायक आणि चिंता कमी करणारी माहिती समोर येत आहे. भारतात सुरूवातीला आढळलेले ओमायक्रॉनचे निम्मे रूग्ण बरे झाले आहेत. 


दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण सापडून आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. परंतु, अद्याप त्याच्याविषयी फासशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे जग ओमायक्रॉनबाबत अजूही अंधारात आहे. यू. के. मध्ये दर काही दिवसांनी ओमायक्रॉनचे रूग्ण दुप्पट झाले आहेत.  


कोरोनाचा प्रार्दुभाव काहीसा कमी होत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी थोडासा सुटकेचा निश्वास सोडला होता. तोपर्यंत ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. त्यामुळे अद्याप तर हे स्पष्ट झाले नाही की, 2022 हे वर्ष तरी कोरोनाच्या सावटातून मुक्त होईल की, 2021 सारखेच संकटाचे जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेले निर्बंध काहीशे कमी करण्यात आले आहेत. 
 
ओमायक्रॉनच्या सुरुवातीच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, ओमायक्रॉन हा डेल्टा पेक्षाही जास्त भयंकर आहे. तो जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे मृत्यू दरातही वाढ होते. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि आधीच कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही ओमायक्रॉनचा धोका आहे. तज्ञांच्या मते ओमायक्रॉन डेल्टालाही मागे टाकू शकतो.    


 ओमायक्रॉन किती वेगाने पसरत आहे?


दक्षिण आफ्रिकेतील गौतेंगमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण सापडला. तेव्हापासून त्याच्या वेगाचा अभ्यास करण्यात येत आहे. ओमायक्रॉनची लागण झालेला रूग्णापासून किमाण तीन लोकांना ओमायक्रॉनची लागण होते, असे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तेथील आधी आलेल्या कोरोनाच्यी तीन्ही लाटांपेक्षा ओमायक्रॉनचे रूग्ण जास्त जास्त आहेत.  


दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयांमधील 3 डिसेंबर रोजीच्या डेटानुसार, रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णांमधील 68 टक्के रूग्ण हे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक आहेत.   


संबंधित बातम्या 


Omicron : ओमायक्रॉन जीवघेणा नाही, सौम्य लक्षणं आणि रुग्णांचं प्रमाणही कमी; ओमायक्रॉनचा शोध लावणाऱ्या आफ्रिकेतील डॉक्टरांचं मत


BMC Dharavi Pattern : ओमायक्रॉन रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा 'धारावी पॅटर्न-2' ABP Majha