Ukraine Russia War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी केला आहे. झेलेन्स्की यांनी यूएस खासदारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.
रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय रशियन सैन्याने युक्रेनचे दोन अणुप्रकल्प ताब्यात घेतले असून तिसरा प्रकल्प ताब्यात घेण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनियन सैन्याचे देशाच्या मध्य आणि आग्नेय भागातील प्रमुख शहरांवर नियंत्रण आहे. तर रशियन सैन्याने खार्किव्ह, निकोलायेव, चेर्निहाइव्ह आणि सुमी यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. याशिवाय युक्रेनच्या सरकारने शनिवारी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये चेर्निहाइव्हमध्ये एक रशियन विमान आकाशातून कोसळताना
रशिया आणि युक्रेनधील युद्धाचा आजचा 11 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशियाने सीमेला लागून असलेली अनेक शहरे ताब्यात घेतली आहेत. तर रशियाचे दहा हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर युक्रेनचेही मोठे नुकसान केल्याचा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. या युद्धामुळे युक्रेनमधील 12 लाखांहून अधिक लोकांनी पलायन केल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दावा केला आहे की, आम्ही लवकरच आमचे उद्दिष्ट पूर्ण करू. युक्रेनच्या सर्व लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War: Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येऊ शकते? जाणून घ्या शक्यता
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर