Ukraine Russia War : रशिया-युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) आता सात महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष संपण्याचं चिन्हं दिसत नाही. त्यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी मोठं विधान केलं आहे. नाटो युद्धात उतरल्यास मोठा विध्वंस होईल, असं पुतिन यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी भारताच्या भूमिकेवरही टीका केली आहे. पुतिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना रशिया आणि युक्रेनमधील संघर्षावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी नाटोला कठोर शब्दात संदेश दिला.


रशियाने गेल्या काही दिवसांत युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये सध्या अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे युक्रेन युद्धामुळे झालेलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे रशिया युक्रेनवर अधिक जोरदार हल्ले चढवत आहे. पुतिन यांनी आता नाटोला इशारा दिला आहे. पुतिन यांनी एका कार्यक्रमात चर्चा सत्रादरम्यान म्हटलं आहे की, युक्रेन आणि रशियाच्या संघर्षामध्ये नाटो उतरला तर जागतिक विध्वंस होईल.




पुतिन भारताबद्दल म्हणाले...


व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन आणि रशिया संघर्षात भारताच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. या मुद्द्यावर शांततापूर्ण चर्चेने मार्ग काढावा, अशी त्यांची भूमिका आहे.




NATO म्हणजे काय?


नाटो (NATO) हेच रशिया आणि युक्रेनमधील वादाचं मूळ असल्याचं मानलं जातं. NATO म्हणजे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटो ही अमेरिका आणि युरोपीय देशांची एक लष्करी युती आहे. याची स्थापना 1949 मध्ये झाली. युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचं आहे, परंतु रशियाची याच्या विरोधात आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटो देशांच्या लष्कराची मदत युक्रेनला होईल, असं रशियाला वाटतं. 


युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याला रशियाचा विरोध


दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं. यावेळी दोन महासत्ता होत्या. एक अमेरिका आणि एक सोव्हिएत युनियन. सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर 15 नवीन देश निर्माण झाले. हे 15 देश म्हणजे आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, लाटविया, लिथुआनिया, मोल्दोव्हा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान. पण रशिया अद्यापही युक्रेनला आपलाच एक भाग समजतो. म्हणून युक्रेन नाटोमध्ये सामील होऊन नये, अशी रशियाची इच्छा आहे.