मॉस्को : रशियामधील टॅटप्रोफ ही खासगी कंपनी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. टॅटप्रोफ ही एक अॅल्युमिनियमच्या वस्तू बनवणारी कंपनी आहे. या कंपनीने त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना स्कर्ट घालून आणि मेकअप करुन कार्यालयात येण्यास सांगितले आहे. त्याबदल्यात कंपनी त्या महिलांना दर दिवशी 104 रुपये अधिक पगार देणार आहे.


कंपनीच्या कामाचे ठिकाण आणि कार्यालयामध्ये जीवंतपणा आणण्यासाठी या कंपनीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 'फेमिनिटी मॅरेथॉन' असे या कार्यक्रमाचे नाव असून 30 जूनपर्यंत हा कार्यक्रम सुरु राहील. ज्या महिला यामध्ये सहभागी होत दररोज मेकअप करुन आणि स्कर्ट घालून कार्यालयात येतील, त्या महिलांना कंपनी रिवॉर्ड म्हणून अधिकचे 104 रुपये देईल.

उन्हाळ्यासाठी कॉटन कुर्तीची बाजारात मागणी | स्टाईलबाजी | घे भरारी | एबीपी माझा



कंपनीच्या या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. रशियामधील सोशल मीडियावर ही कंपनी ट्रोल होत आहे. परंतु टीकेनंतर कंपनीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, या कार्यक्रमामुळे महिलांना त्यांच्या सुंदरतेची जाणीव होईल. या कार्यक्रमामुळे कंपनीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा होईल.

उन्हाळ्यातही वापरा ट्रेंडिंग फॅशन, कॉटन वनपीसचा वाढता ट्रेंड | स्टाईलबाजी | घे भरारी | एबीपी माझा



'फेमिनिटी मॅरेथान' हा कार्यक्रम 27 मे ते 30 जूनदरम्यान सुरु राहील. तसेच त्याच महिला कर्मचाऱ्यांना अधिकचे पैसे मिळतील, ज्या महिला दररोज स्कर्ट घालून आणि मेकअप करुन कार्यालयात येतील.

प्रातिनिधीक फोटो