Russia vs America : नुकतेच अमेरिकेच्या (America) व्हाईट हाऊसने (White House) दावा केला की, रशिया उपग्रहांना लक्ष्य करण्यासाठी अण्वस्त्रे विकसित करत आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी रशियावर 1967 च्या अवकाश कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी अमेरिकेचा दावा फेटाळून लावला आहे, त्यांनी म्हटलंय की, रशियाचा अवकाशात अण्वस्त्रे विकसित करण्याचा कोणताही हेतू नाही. 


 


रशियन राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?


एपी वृत्तसंस्थेनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, रशियाचा अवकाशात अण्वस्त्रे तैनात करण्याचा कोणताही विचार नाही. रशियाने केवळ अमेरिकेइतकीच अवकाश क्षमता विकसित केली आहे. गेल्या आठवड्यात व्हाईट हाऊसने प्रसारमाध्यमांच्या वृत्ताला दुजोरा दिला होता आणि म्हटले होते की, रशियाने अंतराळातील उपग्रह निकामी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी शस्त्रे विकसित केली आहेत. हे रशियन शस्त्र धोकादायक आहे.


 


"आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे', पुतिन म्हणाले..


अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांच्या भेटीदरम्यान सांगितले की, "आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे," अंतराळात अण्वस्त्रांच्या तैनातीला आमचा नेहमीच उघड विरोध होता आणि राहील. आम्ही सर्व देशांना या क्षेत्राबाबत (स्पेस) केलेल्या सर्व करारांचे पालन करण्याचे आवाहन करतो. रशियाने अमेरिका किंवा इतर देशांइतकीच अवकाश क्षमता विकसित केली आहे, असं पुतिन म्हणाले. रशियावर असे आरोप करून व्हाईट हाऊस अमेरिकन काँग्रेसला युक्रेनला मदत करण्यास भाग पाडत आहे. तसेच रशियावर असे आरोप करून व्हाईट हाऊस अमेरिकन काँग्रेसला युक्रेनला मदत करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप शोईगु यांनी केला आहे. 


 


अमेरिकेशी चर्चा करणे अशक्य : पुतिन


पुतिन यांनी पुढील काही दिवसांत अमेरिकेशी संभाव्य चर्चा नाकारली नाही. मात्र, युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला पराभूत करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमुळे सध्या अमेरिकेशी चर्चा करणे अशक्य असल्याचे ते म्हणाले. एकीकडे अमेरिका आणि पाश्चात्य देश रशियाचा पराभव घोषित करत आहेत, तर दुसरीकडे त्यांना स्थिरतेबद्दल बोलायचे आहे. या गोष्टींचा एकमेकांशी संबंध नसल्याची बतावणी ते करतात. पाश्चात्य देशांची ही रणनीती कामी येणार नाही." असं पुतिन म्हणाले.


अमेरिकेने काय दावा केला?


व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी म्हणाले, "मी अंतराळ-आधारित रशियन शस्त्रास्त्रांबद्दल माहिती देत आहे, जी महत्वाची आहे. मी पुष्टी करू शकतो की, रशिया जी शस्त्रे विकसित करत आहे. होय, ती शस्त्रे सुसज्ज आहेत. मात्र, ते अद्याप तैनात करण्यात आलेले नाही. पण रशियाने अशा खास शस्त्राचा शोध लावणे ही सर्वांनाच अस्वस्थ करणारी बातमी आहे. या शस्त्राचा वापर मानवांवर हल्ला करण्यासाठी किंवा पृथ्वीवर विनाश घडवण्यासाठी केला जाऊ शकत नाही. या संदर्भात आम्ही रशियावर बारकाईने निरीक्षण करीत आहोत आणि तसेच ते अत्यंत गांभीर्याने घेत आहोत