Russia Ukraine War : युट्यूबने (YouTube) युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाबाबत आपले निर्बंध कडक केले आहेत. आता कंपनीने रशियन निधीतून चालत असलेले सर्व चॅनेल तात्काळ ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरात या युट्यूब चॅनेलवर बंदी असेल. या निर्णयामागे कंपनीने आपल्या धोरणाचा हवाला देत हिंसक घटनांना पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे.


'रशियाचे आक्रमण हिंसक घटना' 
जगातील सर्वाधिक वापरले जाणारे स्ट्रीमिंग व्हिडिओ प्लॅटफॉर्म युट्यूबने म्हटले आहे की, रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आता हिंसक घटनांच्या धोरणाखाली येत आहे. युट्यूबची मालकी अल्फाबेट इंक (Alphabet Inc) अर्थात गुगलकडे (Google) आहे.


युट्यूबने युक्रेनवरील हल्ल्याच्या संबंधित कंटेट हटवला
YouTube चे प्रवक्ते फरशाद शाडलू यांनी सांगितले की, "आमची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे अशा हिंसक घटनांना प्रतिबंधित करतात आणि आम्ही अशा सामग्रीला प्रतिबंधित करतो. आम्ही रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाशी संबंधित अनेक सामग्री देखील काढून टाकली आहे. आता आम्ही ती सर्व काढून टाकली आहे. रशियनशी संबंधित असलेल्या चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य-अनुदानीत माध्यम.


याआधीही यूट्यूबने लादले होते निर्बंध
गुगलने याआधीही आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर रशियासाठी कडक निर्बंध लावले होते. त्यानंतर यूट्यूबने रशियाशी संबंधित सर्व चॅनेलला या प्लॅटफॉर्मवरून कमाई करण्यावर बंदी आणली. फेसबुकच्या निर्णयानंतरच त्याने हे पाऊल उचलले. फेसबुकने याआधी रशियातील लोक आणि तेथील कंपन्यांवर फेसबुकच्या कमाईवर बंदी घातली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha