Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामधील संघर्ष अद्याप सुरुच आहे. आता युक्रेनच्या अधिकार्‍यांशी वाटाघाटी करणार्‍या रशियन शिष्टमंडळाच्या प्रमुखाने म्हटले आहे की, दोन्ही बाजू युक्रेनच्या तटस्थ स्थितीबाबतच्या कराराच्या जवळ पोहोचल्या आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. रशियन शिष्टमंडळाचे अध्यक्ष व्लादिमीर मेडिन्स्की यांनी शुक्रवारी सांगितले की, युक्रेनच्या नाटोमध्ये सामील होण्याच्या आणि तटस्थ भूमिका घेण्याच्या मुद्द्यांवरील दोन्ही बाजूचे मतभेद दूर होण्याच्या जवळ पोहोचले आहेत.


रशियन वृत्तसंस्थांना मेडिन्स्की यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, 'युक्रेनचे नाटो सदस्यत्वापासून दूर राहणे हा युक्रेन आणि रशियातील चर्चेचा मुख्य मुद्दा आहे आणि या विषयावर दोन्ही बाजूंची मत एकमेकांच्या जवळ येत असल्याचं दिसत आहेत.' मेडिन्स्की यांनी अधोरेखित केले की, कीव्ह युक्रेनचा रशिया समर्थित पूर्वेकडील फुटीरतावादी प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी आग्रही आहे, तर रशियाचे मते या भागातील जनतेला स्वतःचे भवितव्य ठरवू द्यावे.


रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक प्रमुख शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दुसरीकडे लाखो लोक देशातून पळून जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये आतापर्यंत किमान 816 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर, युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे 6.5 दशलक्ष लोकांनी देश सोडून शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. दुसरीकडे युक्रेनचे म्हणणे आहे की, रशियाने टाकलेले अनेक बॉम्ब फुटलेले नाहीत, ते निकामी करायला अनेक वर्षे लागतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha