Russia Ukraine War : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सध्या सुरु असलेल्या युद्धानं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. आज या युद्धाचा 24वा दिवस. दोन्ही देशांमधील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत आहेत. तर दिवसागणिक रशिया आणखी आक्रमक होताना दिसत आहे. तर बलाढ्य रशियाला युक्रेननंही जशास-तसं उत्तर देत आहे. रशियाकडून युक्रेनवर सातत्यानं हल्ले केले जात आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक युक्रेनमधील नागरिकांनी दुसऱ्या देशात आसरा घेतला आहे. तर या युद्धात अनेक निरपराध लोकांचा बळी गेला आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर आणखी एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन बॉम्ब निकामी करणारे (Bomb Defusing Process) कर्मचारी रशियन बॉम्ब निकामी करताना दिसत आहेत.



व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये युक्रेनियन सैन्याची बॉम्ब निकामी करण्याची पद्धत पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसत आहे. कारण ते दोघं फक्त एका पाण्याच्या बाटलीचा वापर करुन  बॉम्ब निकामी करत आहेत. फक्त 31 सेकंदांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडीओला 3.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रशियाकडून डागण्यात आलेल्या रॉकेटचा स्फोट न होता, ते जमिनीवर पडलेले दिसलं. जे दोन सैनिक निकामी करतात. व्हिडीओ पाहताना अंगावर चक्क काटा येतो. 


दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी श्वासच रोखला होता. ट्विटरवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यासोबतच नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रियाही देत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :