Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामधील युद्धाला 24 दिवस झाले आहेत. लष्कराने युक्रेनमधील जवळपास सर्व प्रमुख शहरे उद्ध्वस्त केली आहेत. दरम्यान, युक्रेनच्या खासदारांनी रशियावर मोठा गंभीर आरोप केला आहे. रशियान सैनिक शहरांवर युक्रेनमध्ये बलात्कार करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. रशियन सैनिक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर बलात्कार करून नंतर त्यांना फाशी दिली जात असल्याचा दावा रशियातील खासदारांनी केला आहे.
युक्रेनच्या विरोधी होलोस पक्षाच्या खासदार लेसिया वासिलेंको यांनी दावा केला आहे की, सैनिक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर बलात्कार करत आहेत. त्याचबरोबर हिंसा टाळण्यासाठी अनेक महिलांनी लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केल्या, तर काही इतक्या अशक्त होत्या की अत्याचारानंतर त्या जगू शकल्या नाही.
पीडित महिला आवाज उठवत नाहीत
लेसिया वासिलेंको म्हणाल्या की, युद्धादरम्यान 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांवर बलात्कार झाल्यानंतर त्यांनी फाशी देण्यात आली किंवा काहींनी स्वतःचा जीव घेतला. त्या सांगितले की, यामध्ये मुख्य अडचण ही आहे की पीडित आणि कुटुंबीयांकडे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद किंवा क्षमता नाही.
बलात्कारानंतर महिलांना दिली जाते फाशी
खासदार पुढे म्हणाल्या की, बलात्कार झालेल्या काही महिलांनाही फाशी देण्यात आली आहे. या अन्यायाविरुद्ध आम्ही पुरावे गोळा करत आहोत आणि युद्धादरम्यान झालेल्या या गुन्ह्याची खटला आम्ही ईसीएचआर (युरोपियन कन्व्हेन्शन ऑन ह्युमन राइट्स) कडे नेणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. युक्रेनमध्ये पीडितांना योग्य मदत मिळण्यासाठी त्यांनी मानवतावादी मदत देण्याचे सरकारला आवाहन केले आहे.
या महिलांच्या मदतीने आम्ही युद्धादरम्यान केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे गोळा करू शकू आणि पुतिन यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युद्ध गुन्ह्यांचा खटला चालवता येईल, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : चक्क पाण्यानं केला बॉम्ब निकामी; युक्रेनच्या सैनिकांचा कारनामा, Video व्हायरल
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाबाबत शी जिनपिंग यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
- Russia Ukraine Crisis : रशियाचा युक्रेनवर रॉकेट हल्ला; अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha