Russia-Ukraine War : जगातील महासत्ता असलेला देश रशियाने (Russia) आपल्या शेजारी देश युक्रेनवर (Ukraine) क्षेपणास्त्रे डागायला सुरुवात केली तेव्हा युद्धाच्या भीतीने अनेक लोक घाबरले होते. विविध देशांत तणावाची स्थिती निर्माण झाली. काही वेळातच हे युद्ध असल्याचे स्पष्ट झाले. युएसएसआरचा भाग असलेल्या युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष पुतिनने हल्ला का केला?  समजून घ्या.



रशिया आणि युक्रेन एकाच दिवशी अस्तित्वात
ज्याप्रमाणे स्वतंत्र भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी अस्तित्वात आले. त्याचप्रमाणे रशियन प्रजासत्ताक आणि युक्रेनही एकाच दिवशी अस्तित्वात आले. हा दिवस 25 डिसेंबर 1991 होता. या दिवशी सोव्हिएत रशियाचे (युएसएसआर) विघटन होऊन 15 नवीन देशांची निर्मिती झाली. या 15 देशांमध्ये युक्रेन आणि रशियाचाही समावेश होता. 1991 पूर्वी, सोव्हिएत रशिया जगातील कम्युनिस्ट गटाचे नेतृत्व करत होता आणि त्याची अमेरिकेशी जोरदार स्पर्धा होती. त्यानंतर सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील तीव्र शत्रुत्वाचा सामना करावा लागला, दोन्ही देश अनेकदा युद्धाच्या टोकाला आले. 1945 ते 1991 हा काळ जग शीतयुद्ध म्हणून ओळखू लागला. पण अमेरिका या शर्यतीत विजयी झाली आणि 25 डिसेंबर 1991 रोजी यूएसएसआर 15 देशांमध्ये विभागली गेली. यामुळे अमेरिका संपूर्ण जगाचा पुढारी बनला.



1991 मध्ये, रशिया निराश झाला
 1991 मध्ये ते अनेक भागांमध्ये विभागले गेले.  रशियन नागरिकंमध्ये नाराजीची लाट पसरली. त्या वेळी रशियाची स्थिती खूपच कमकुवत होती. इच्छा नसतानाही त्याला आपल्या साम्राज्याचा ऱ्हास सहन करावा लागला. USSR च्या विघटनानंतरही, अमेरिकेची रशियावर दडपशाही राहिली. नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) या लष्करी संघटनेच्या माध्यमातून यूएसएसआरपासून विभक्त झालेल्या देशांना अमेरिकेने पोसण्यास सुरुवात केली आणि या देशांना आपल्या प्रभावाखाली घेण्यास सुरुवात केली.



NATO ची पूर्व युरोपवर कुटनीती 
1991 मध्ये, यूएसएसआरमधून विभक्त होत 15 देश बनले. हे देश आहेत आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, लाटविया, लिथुआनिया, मोल्दोव्हा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान. 2004 मध्ये, या 15 देशांपैकी 3, लॅटव्हिया, लिथुआनिया आणि एस्टोनिया नाटोचे सदस्य झाले. याचा अर्थ अमेरिका आता रशियाच्या गळ्यातला ताईत झाली होती. कारण बाल्टिक प्रदेशात असलेले हे तीन देश युएसएसआरमधून बाहेर पडले आणि त्यांच्या सीमा रशियाला मिळाल्या. नाटो देशांमध्‍ये एक करार आहे की, NATO च्‍या कोणत्याही एका देशावर हल्ला झाला तर NATO च्‍या सर्व सदस्‍यांनी त्‍याला स्‍वत:वर केलेला हल्‍ला समजला जाईल आणि लष्करी सामर्थ्याने प्रत्युत्तर देतील. नाटोमध्ये सध्या 30 देश आहेत. अशा प्रकारे अमेरिकेने नाटोच्या माध्यमातून रशियाला वेढा घातला



युक्रेनला नाटोचे सदस्य व्हायचे आहे, पुतिन यांना अजिबात मान्य नाही
युक्रेन आणि रशियाच्या सीमा एकमेकांना मिळतात. युक्रेनलाही आपली ताकद वाढवण्यासाठी नाटोमध्ये सामील व्हायचे होते. युक्रेनने आपल्या भौगोलिक स्थितीचा फायदा घेत अमेरिकेला नाटोचे सदस्य बनवण्याची मागणी केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष गेल्सिन्की यांच्या या वागण्याने पुतिन चांगलेच चिडले होते. त्याने युक्रेन सीमेवर आपले सैन्य पाठवण्यास सुरुवात केली. रशियाच्या युक्रेनसोबतच्या तणावाचे हे तात्कालिक कारण आहे


पुतिन युक्रेनला पश्चिमेची बाहुली म्हणताएत
रशिया उघडपणे युक्रेनचे पाश्चात्य जगाचे कठपुतळी असे वर्णन करतो. रशियाचे म्हणणे आहे की, अमेरिकेसह नाटो सदस्य देशांनी पूर्व युरोप आणि युक्रेनमध्ये त्यांच्या लष्करी कारवाया करणार नाहीत याची लेखी हमी द्यावी. युक्रेन हे कधीच स्वतंत्र राष्ट्र नव्हते, असेही पुतीन म्हणतात.


1999 पासून पुतिन  खास अजेंडावर 
जेव्हा अमेरिका नाटोच्या नावाखाली पूर्व युरोपमध्ये कारवाया वाढवत होती, तेव्हा पुतिनही गप्प बसले नाहीत. पुतिन यांनी आधीच सांगितले आहे की, जर ते त्यांच्या नियंत्रणाखाली असतील तर ते यूएसएसआरचे विघटन उलटवून टाकतील. पुतिन यांचा रशियाच्या राजकारणात 1999 मध्ये प्रवेश  झाला होता. यानंतर ते 2000 मध्ये राष्ट्रपती झाले. तेव्हापासून ते 1991 ची कथित 'ऐतिहासिक चूक' सुधारण्यात मग्न आहेत. पुतिन यांनी 1999 मध्ये चेचन्याला रशियाशी जोडले. तेव्हापासून, पुतिन युएसएसआरचे प्राचीन वैभव प्राप्त करण्यात गुंतले आहेत. आज पुतिन यांनी जे धोरणात्मक पाऊल उचलले आहे, तेच पाऊल पुतिन यांनी 2008 मध्ये केले होते. युएसएसआरचा भाग असलेल्या जॉर्जियाच्या दोन राज्यांना त्यांनी स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आणि तेथे आपले लष्करी तळ बनवले.


क्रिमीयावर ताबा
2014 मध्ये, पुतिन यांनी युक्रेनचा भाग असलेल्या क्रिमियाला ताब्यात घेतले. क्रिमिया हा काळ्या समुद्रातील एक प्रदेश आहे. हे युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांच्या जवळ आहे. येथील बहुसंख्य लोक रशियन भाषा बोलतात. पुतिन यांनी प्रथम येथे रशिया समर्थक सरकार बनवले, नंतर आपले सैन्य पाठवून हा भाग ताब्यात घेतला.


रशियन संस्कृतीचा मोठा प्रभाव 
क्रिमियावरील रशियाच्या ताब्यामुळे अमेरिका आणि नाटो तणावात होते. रशियाला रोखले नाही, तर युक्रेनचे स्वतंत्र अस्तित्वही धोक्यात येऊ शकते, हे अमेरिकेला समजले. त्यामुळेच युक्रेनला नाटोमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. यावर पुतिन यांचा विरोध होता. खरं तर, युक्रेनच्या लोकसंख्येवर रशियाचा मोठा प्रभाव आहे. येथे पाचपैकी एक जण रशियन बोलतो. येथे रशियाचा सांस्कृतिक प्रभाव आहे. जर आपण युक्रेनच्या पूर्वेकडील भागाबद्दल बोललो तर येथील लोक स्वतःला रशियाच्या जवळचे समजतात तर पश्चिमेकडील लोक स्वतःला युरोपच्या जवळचे समजतात. हा या देशातील वर्चस्वाचा लढा आहे. युक्रेनचा पूर्व भाग रशियाला लागून आहे आणि इथले लोक रशियन बोलतात तर पश्चिमेकडे ते अगदी उलट आहे. 


रशियन क्षेपणास्त्रे कीवमध्ये 
रशियाचा असा दावा आहे की त्याला युक्रेनमधील लोकांना युक्रेनच्या जुलूमशाहीपासून मुक्त करायचे आहे. 24 फेब्रुवारी रोजी, युक्रेनची राजधानी कीवमध्ये पहाटे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करायला सुरुवात केली, तेव्हा रशियाने पुन्हा एकदा सांगितले की ते युक्रेनच्या लोकांना मुक्त करण्यासाठी हा हल्ला करत आहे आणि शहरे ताब्यात घेण्याचा त्यांचा हेतू नाही.


लुहान्स्क आणि डोनेस्तक सार्वभौम देशांना मान्यता 
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रथम युक्रेनच्या लुहान्स्क आणि डोनेस्तक या दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. हे दोन्ही प्रदेश युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आहेत. येथे रशिया रणनीती अंतर्गत फुटीरतावादी शक्तींना समर्थन देतो, या प्रदेशाचे रशियाच्या ऐतिहासिक प्रजासत्ताकाचा भाग असल्याचे उघडपणे वर्णन करतो. या रणनीतीवर काम करताना, पुतिन यांनी 21 फेब्रुवारी रोजी युक्रेनच्या दोन प्रदेशांना सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या: