Stephen Wilhite Died : संगणक शास्त्रज्ञ आणि GIF चे निर्माता, स्टीफन विल्हाइट यांचे वयाच्या 74 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. विल्हाइट हे ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅटच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग होते, एक अॅनिमेटेड इमेज फॉरमॅट जो आता सोशल मीडिया आणि इंटरनेटवर दैनंदिन जीवनात वापरला जातो. 1980 च्या दशकात काम करताना त्यांनी हे स्वरूप तयार केले.
COVID-19 ची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली
विल्हाइटची पत्नी कॅथलीनच्या म्हणण्यानुसार, 1 मार्च रोजी स्टीव्ह विल्हाइट यांना COVID-19 ची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. स्टीफन अंतिम श्वास घेताना त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबत होते. विल्हाइट एक अतिशय नम्र, दयाळू आणि चांगला माणूस म्हणून परिचित होते. 2013 मध्ये, वेबी पुरस्कारांनी विल्हाइटला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात एक GIF चा वापर केला, तेव्हापासून GIF हे इंटरनेटवरील संवादाचा मुख्य आधार आहेत.
प्रतिक्रिया, शब्दचित्रे आणि मीम्स तयार करण्यासाठी GIF चा वापर
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, विल्हाइटने ऑनलाइन संस्कृतीतील योगदानाबद्दल 2013 मध्ये वेबी अवॉर्ड्सकडून जीवनगौरव पुरस्कार मिळवला. विल्हाइट हे ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅटच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग होते, एक अॅनिमेटेड इमेज फॉरमॅट जो आता सोशल मीडिया आणि इंटरनेटवर दैनंदिन जीवनात वापरला जातो. 1980 च्या दशकात काम करताना त्यांनी हे स्वरूप तयार केले. विविध वेबसाइटच्या वापरकर्त्यांनी 2010 च्या दशकात त्यांच्या प्रतिक्रिया, शब्दचित्रे आणि मीम्स तयार करण्यासाठी GIF चा वापर केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : लाखो डॉलर्स घेऊन पळून जात होती युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी, सुटकेससह हंगेरियन सीमेवर सैनिकांनी पकडले
- Ukraine Russia War : युद्धामुळे नागरिकांना महागाईचा फटका, रशियन सुपरमार्केटमध्ये साखरेसाठी धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल