Russia Ukraine Crisisगेल्या काही दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेन(Ukraine) मध्ये युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनवर रॉकेटनं हल्ला करत आहे.  यामध्ये अनेक युक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेनमधील अभिनेत्री ओक्साना श्वेत्स (Oksana Shvets) यांचा या रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला आहे.  ओक्साना या कीव्हमध्ये राहात होत्या. त्या राहात असलेल्या इमारतीवर रशियाच्या रॉकेटनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ओक्साना यांचा मृत्यू झाला. त्या 67 वर्षाच्या होत्या. ओक्सानाच्या यंग थिएटर ग्रुपचा भाग होती. द हॉलिवूड रिपोर्टनुसार, युक्रेननं ओक्सानाला युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एका सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. 
 
बायडन यांनी पुतीन यांना " युद्ध गुन्हेगार" म्हटले
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील नागरिकांवर विनाशकारी परिणाम झाला. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुतीन यांना "युद्ध गुन्हेगार", असं म्हटलं. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर व्हाइट हाऊसमधील प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितलं, 'मला वाटते की राष्ट्रपतींचे हे वक्तव्य पुरेसे आहे. ते मनापासून बोलत होते. टिव्हीवर त्यांनी पाहिलेल्या हल्ल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं.'


रशियन सैनिकांनी खार्किवजवळ हवाई हल्ला केला 


23 तारखेलाही रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बस्फोट केले. रशियन सैनिकांनी खार्किवजवळ हवाई हल्ला केला. हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर रशियाने युद्ध थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha