Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया (Ukraine) यांच्यात युद्ध सुरूच आहे. रशिया युक्रेनची राजधानी कीवला (Kyiv) वेढा घालण्याचा विचार करत आहे. युक्रेन आणि रशिया (Ukraine) यांच्यात युद्ध सुरूच आहे. रशिया युक्रेनची राजधानी कीवला (Kyiv) वेढा घालण्याचा विचार करत आहे. तसेच जोरदार बॉम्बफेक करत आहे. दरम्यान, रशियन सैन्य सध्या युक्रेनच्या राजधानीतून बाहेर पडल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेवरून येत आहे. युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे की ते सध्या राजधानी कीवच्या बाहेर रशियन सैन्याशी लढत आहेत.


शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचे मोदींचे आवाहन


ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस म्हणाले होते की, रशियाचा हेतू संपूर्ण युक्रेन ताब्यात घेण्याचा आहे. पण रशियन सैन्याला पहिल्याच दिवशी असे करण्यात अपयश आले. आतापर्यंत युक्रेनला मदत करण्यासाठी कोणीही हात वर केलेला नाही. अमेरिकेनेही युक्रेनला आतापर्यंत कोणतीही विशेष मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत असहाय्य दिसणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियासोबतच्या युद्धात युक्रेन एकटे पडले आहे. त्याचबरोबर युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी 137 जणांना जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. दरम्यान, पीएम मोदींनी पुतीन यांना युद्ध ताबडतोब थांबवून शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे.


 






जसा भारतासाठी पाकिस्तान आहे, तसा रशियासाठी युक्रेन


युक्रेन आणि रशियामधील संघर्षामुळे जगभरात खळबळ माजली आहे. आता या युद्धजन्य परिस्थिती इतर कोणते देश रशियाच्या आणि युक्रेनच्या पाठिशी उभे असणार आहेत, हे येत्या काळात समजेल. यावेळी भारताच्या भूमिकेबाबतही वृत्त समोर येत आहे. भारताने युक्रेन आणि रशियामधील युद्धात तटस्थ भूमिका घेत शांततेचं आवाहन केलं आहे. दरम्यान, एका रशियन अभ्यासकाने युक्रेन-रशिया संघर्षाची तुलना भारत-पाकिस्तान संघर्षाशी केली आहे. आंतरराष्ट्रीय विषयांचे रशियन अभ्यासक अलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी रशिया-युक्रेन संघर्षाची तुलना भारत-पाकिस्तान संबंधांशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'जसा भारतासाठी पाकिस्तान आहे, तसा रशियासाठी युक्रेन आहे.' पुतीन रशियामध्ये युक्रेनला सामावू इच्छित आहे का यावर त्यांनी नाही असे म्हटले आहे. युक्रेनचा मोठा भाग स्टालिनिस्ट राजवटी, कम्युनिस्ट राजवटी इत्यादींनी युक्रेनला कसा दिला हे पुतिन यांनी भाषणात सांगितले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha