Ukrainian Soldier Viral Video : रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. यामध्ये आतापर्यंत युक्रेनच्या 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहेत. अशातच आता आता युद्धातील एका युक्रेनियन सैनिकाचा भावूक करणार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गुरुवारी सकाळपासून युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर रशियन लष्करी कारवाई सुरू असून तिन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.


युक्रेनियन सैनिकाच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हा सैनिक त्याच्या पालकांना संदेश देताना दिसत आहे. त्याने म्हटले आहे की, "आई, बाबा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो," व्हिडिओमध्ये सैनिकाचे नाव समोर आलेले नाही. हा सैनिक युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीबाबत सांगत आहे.






युक्रेनच्या 137 नागरिकांचा मृत्यू


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्कीयांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 316 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये रशियन लोकांनी ताब्यात घेतलेल्या ओडेसा प्रदेशातील झमीनी बेटावरील सर्व सीमा रक्षकांचा समावेश आहे. रशियन सैन्याने चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावरही ताबा मिळवला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha