कीव : रशिया आणि युक्रेनमधलं युद्धा आणखीच विद्ध्वंसक होत आहे. रशियाने युक्रेनच्या झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर ताबा मिळवला आहे. यानंतर युरोपपासून अमेरिकेपर्यंत खळबळ माजली आहे. ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.


रशियन सैन्याने झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर जोरदार हल्ला केला. यानंतर प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्राला आग लागली. हल्ल्यात प्लांटच्या युनिट 1 च्या रिअॅक्टर कम्पार्टमेंटचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या प्रकल्प कार्यान्वित नाही परंतु आत न्यक्लिअर फ्यूअल असल्याची माहिती आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. मात्र किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणत्याही बदलाची नोंद नाही


Ukraine Russia War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पात आग


जो बायडन, बोरिस जॉन्सन यांची झेलेन्स्की यांच्याशी चर्चा 
अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याचं वृत्त समोर येताच युरोपपासून अमेरिकेपर्यंत खळबळ माजली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. पुतीन यांचा बेजबाबदारपणा संपूर्ण युरोपच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत असल्याचं वक्तव्य जॉन्सन यांनी केलं. तसंच या मुद्द्यावर काही तासातच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावल्याचं जॉन्सन यांनी झेलेन्स्की यांना सांगितलं.


Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, बॉम्बहल्ले अजूनही सुरूच


तर संपूर्ण युरोप नष्ट होईल : झेलेन्स्की
रशियन सैन्याने हल्ला करुन अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, जर अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट झाला तर संपूर्ण युरोप नष्ट होईल.
 
झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प 
एनरहोदर हे नीपर नदीवर वसलेलं एक शहर आहे. एनरहोदरमध्ये युरोपातील सर्वात मोठं झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प आहे. युक्रेनच्या एकूण वीज उत्पादनाच्या जवळपास 25 टक्के उत्पादन या प्रकल्पामध्ये होतं. जर रिॲक्टरला धक्का लागला असता तर चर्नोबिलपेक्षाही 10 पटीने विध्वंस झाला असता.