Russia Ukraine War : युक्रेनमधील कीव्हमध्ये एका आश्रय घेतलेल्या महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून या चिमुकलीचा फोटो शेअर केला असून या मुलीचे नाव 'स्वातंत्र्य' ठेवणार असल्याचे सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत म्हटले आहे की, 'कीव्हमधील आश्रयस्थानात जमिनीखाली, जळत्या इमारती आणि रशियन रणगाड्यांच्या आवाजात बाळाचा जन्म झाला. आम्ही या बाळाचं नाव स्वातंत्र्य ठेवणार आहोत. युक्रेनवर विश्वास ठेवा #StandWithUkrain'


रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियन सैन्याने अनेक शहरांना लक्ष्य केले आहे. सुरक्षित निवारा मिळण्यासाठी लोक शेजारील देशांमध्ये जात आहेत. युक्रेनच्या कीव्हसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी मेट्रो स्टेशन खाली आश्रय घेतला आहे. इथे आसरा घेतल्यास रशियन बॉम्ब हल्ल्यापासून संरक्षण होईल, अशी लोकांना आशा आहे.






 


शेजारील देशांमध्ये आश्रय
युक्रेनियन लोक मोठ्या संख्येने शेजारच्या देशांमध्ये जात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या युरोपातील सर्वात मोठ्या भूमी युद्धात रशियाच्या आक्रमणकर्त्या सैन्याने राजधानी कीव्हला लक्ष्य केल्याने हजारो युक्रेनियन नागरिक शनिवारी देश सोडण्यासाठी सीमेवर पोहोचले. रात्रीच्या अंधारात काही लोक अनेक मैल पायी चालत गेले तर काही लोक ट्रेन, कार किंवा बसने पोहोचले आणि सीमेवर मैलभर लांब रांगाच रांगा लागलेल्या दिसत होत्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha