Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवरील हल्ला अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय. रशियाच्या हल्ल्यामध्ये अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. आता रशियाकडून युक्रेनमधील चिमुकल्यांच्या रुग्णालयाला लक्ष्य केलं गेल्याच समोर आले आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, रशियाने मारियुपोल शहरामधील लहान मुलांचे रुग्णालय आणि प्रसूती केंद्रावर हल्ला आहे. बुधवारी नगर परिषदेच्या सोशल मीडियावरील निवेदनात सांगण्यात आले आहे की, या हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे.


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी याबाबत ट्विट केले आहे की, 'मारियुपोलमध्ये रशियन सैनिकांनी प्रसूती रुग्णालयावर हल्ला केला. लोक, मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. जग किती काळ दहशतीकडे दुर्लक्ष करत राहणार? हत्या थांबवा! तुमच्याकडे सामर्थ्य आहे पण तुम्ही माणुसकी गमावत आहात.'






झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो तैमोशेन्को म्हणाले की, अधिकारी मृत किंवा जखमी लोकांची संख्या निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या रुग्णालयाचा व्हिडिओही शेअर केला आहे.






प्रादेशिक गव्हर्नर पावलो किरिलेन्को यांनी सांगितले की, रशियाने युद्धबंदी कालावधीत मारियुपोलमधील लहान मुलांच्या हवाई हल्ला केला. या हल्ल्यात कामगार महिलांसह 17 जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha