Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. रशियन सैन्याने युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त केले आहे. रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू आहेत. रशियाकडून राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या हत्येचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या निवास स्थानाजवळ रॉकेटचा काही भाग आढळून आला आहे. राष्ट्रपती निवास स्थानावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. रशियाने डागलेल्या हल्ल्यात राष्ट्रपती भवनाचे नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे. 


स्वत: राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडलेल्या या रॉकेटवर भाष्य केले आहे. रशियाचा निशाणा चुकला असल्याचे सांगत त्यांनी याआधीदेखील आपल्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी म्हटले. काही वृत्तांनुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने किमान तीन वेळेस झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. 


झेलेन्स्की यांनी देश सोडला; रशियाचा दावा


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देश सोडून गेल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे. रशियन सरकारचे वृत्तमाध्यम 'स्पुतनिक'ने हा दावा केला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पोलंडमध्ये आश्रय घेतल्याचे या वृत्तात म्हटले. मात्र, हा दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे. झेलेन्स्की देश सोडला नाही आणि राष्ट्रपती अजूनही युक्रेनमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले. 


पाहा: युक्रेनचे President Volodymyr Zelenskyy यांच्या घरावर हल्ला, घराबाहेर पडलं रॉकेट



अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला 


युक्रेनवर रशियाचे हल्ला सातत्याने वाढत आहे, युक्रेनमध्ये (Ukarine) अणुऊर्जा प्रकल्पात (Ukraine nuclear power plant) झालेल्या हल्ल्यात 3 सैनिक ठार झाल्याचे समजत आहे. रशियाने त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियन बॉम्बफेकीमुळे अणु प्रकल्पाला आग लागली असून स्फोटही झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha