Work From Home : अनलॉकिंग, कोरोनाची लाट माघारी गेल्यानंतर अनेक ऑफीसेस पूर्ण क्षमतेने खुली होत आहेत. पण यातच आता ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना या पार्श्वभूमीवर एक भेट दिली आहे. ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल यांनी शुक्रवारी ट्विट करत, या महिन्यात त्यांचे जागतिक कार्यालय पुन्हा सुरू करणार असल्याचं जाहीर केलं. परंतू लोकांना जर ऑफिसमधून काम करायचे असेल तर ते करू शकतात आणि ज्यांना घरातून काम करायचे असेल किंवा इतर कुठूनही (वर्क फ्रॉम एनीव्हेअर) तर हे पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असेल असं त्यांनी जाहीर केलं आहे.


मात्र, पराग अग्रवाल यांनी कर्मचार्‍यांना कार्यालयात परतण्याचे आवाहन करताना सांगितले की, कार्यालयात काम करण्याची वाइब्रेंट संस्कृती निर्माण होईल आणि व्यावसायिक प्रवासही तातडीने सुरू होईल. 15 मार्चपासून सर्व जागतिक ट्विटर कार्यालये उघडतील असं ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी लिहिलं सोबतंच, कुठे काम करायचं, तुम्हाला व्यवसायासाठी सुरक्षितपणे प्रवास करायचा आहे की नाही, किंवा कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असल्याचं ते म्हणाले.






हवं तिथून काम करा


कर्मचार्‍यांना जिथे जास्त उत्पादक आणि सर्जनशील वाटत असेल तिथे काम करायला हरकत नसल्याचं अग्रवाल म्हणाले. यामध्ये "फुल्ली वर्क फ्रॉम होम (WFH) कायमचे" पर्यायाचा देखील समावेश आहे. ज्यांना दूरस्थपणे काम करणे सुरू ठेवायचे आहे त्यांनी काम "शिकणे आणि जुळवून घेणे" आवश्यक आहे, कारण "वेगवेगळ्या ठिकाणांहून काम करणे अधिक कठीण होईल." यावरही त्यांनी भर दिला.


जग कोविड -19 साथीच्या आजाराशी झुंजत असताना, कर्मचारी कार्यालयात परत येण्याची शक्यता कमी होती. पण परिस्थिती आता पूर्वपदावर आल्याने, गुगलने एप्रिलच्या सुरुवातीला आपले सिलिकॉन व्हॅलीतलं कार्यालयं कर्मचार्‍यांसाठी उघडण्याच्या तयारी पूर्ण केली आहे. गुगलला अपेक्षा आहे की त्यांचे कर्मचारी आठवड्यातून फक्त 2 दिवस घरून आणि उर्वरित दिवस ऑफिसमध्ये काम करतील.


संबंधित बातम्या


13 हजारांच्या ऑफरमध्ये मिळणाऱ्या 'या' मोबाईलसमोर आयफोनचा मोबाईलही फिका पडणार, किंमत माहितीये ?


Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या हल्ल्यात 3 सैनिक ठार, IAEA प्रमुखांचा इशारा


Mosque Blast in Peshawar: पाकिस्तानमधील पेशावरच्या मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 56 लोकांचा मृत्यू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha