Russia Ukraine War : सध्या युक्रेन आण रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे. दिवसेंदिवस युक्रेनमधील स्थिती चिंताजनक होत असल्याचे दिसत आहे. रशियन सैन्याने युक्रेनचे लष्करी तळ नष्ट केले आहेत. तसेच अनेक ठिकाणी सतत बॉम्बफेक केली जात आहे. अशातच अनेक भारतीय नागरिक अद्याप युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात आणण्याचे कम सुरु आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत आज 15 विमाने 3 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना देशात आणणार आहेत. भारतीय हवाई दलाची चार विमाने तसेच दुसरी अन्य 11 विमाने देखील आज भारतीय नागरिकांना घेऊन देशात दाखल होणार आहेत. 


रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. पूर्व युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये सतत बॉम्बफेक सुरू आहे. सुमी आणि खार्किवमध्ये अजूनही अनेक भारतीय अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.


10 फ्लाइट दिल्लीत तर 1 मुंबईत उतरणार 


विमान वाहतूक मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 11 नागरी उड्डाणे होणार असून, 2 हजार 200 हून अधिक भारतीय नागरिक आज मायदेशात परतणार आहेत. यापैकी 10 विमाने दिल्लीत आणि एक मुंबईत उतरणार आहे. तर हवाई दलाच्या विमानातून किती नागरिक देशात येणार याबाबत अद्याप माहित मिळालेली नाही. 


दरम्याान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची स्थिती चिंताजनक होत आहे. अजूनही काही भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीव्ह आणि सर्वात मोठे शहर खार्किव येथे अडकले आहेत. 27 फेब्रुवारीला कीव्हमधून निघालेल्या हरजोत सिंह नावाच्या भारतीय विद्यार्थ्यावर गोळी झाडण्यात आली आहे. यामध्ये तो जखमी झाला आहे. सध्या हरजोत कीव्ह येथील रुग्णालयात दाखल आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: