Russia Ukraine War : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे तेथे दहशतीचे वातावरण आहे. एकीकडे अनेक नागरिक जीव मुठीत घेऊन देश सोडण्यासाठी धडपड करत आहेत. तर दुसरीकडे अनेक जण सैन्यदलात सामील होत शत्रू विरोधात दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत. आता युक्रेनच्या एका सौंदर्यवतीनेही रशियाचा सामना करण्यासाठी शस्त्रं हातात घेतली आहेत. युक्रेनियन ब्युटी क्वीन आणि माजी मिस ग्रँड युक्रेन अनास्तासिया लेना (Anastasiia Lenna) ही रशिया विरुद्ध युक्रेनियन सैन्यात सामील झाली आहे.


मिस ग्रँड इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेतील युक्रेनच्या 2015 च्या स्पर्धेत प्रतिनिधत्व करणारी अनास्तासिया लेनाने तिच्या मायदेशाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर रशिया आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी कसे प्रशिक्षण दिले जाते ते शेअर करत इतर महिलांनाही त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या देशासाठी लढण्यासाठी आवाहन केले आहे.


अनास्तासियाने महिलांना युक्रेनमध्ये राहून शत्रूशी लढण्यास सांगितले आहे. तिने महिलांना आवाहन केले आहे. 'देश सोडून पळून जाऊ नका, परंतु शस्त्रे उचलून रशियन सैनिकांविरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर उतरा' अशी तिने विनंती केली आहे.



कोण आहे अनास्तासिया लेना?


अनास्तासियाने मॉडेल आणि जनसंपर्क व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. तिच्या मिस ग्रँड इंटरनॅशनलमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. ती पाच भाषा बोलते. अनास्तासिया सध्या अनुवादक (Translator) म्हणून काम करते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha