Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनधील परिस्थिती बिकट झाली आहे. या युद्धात युक्रेनच्या प्रत्येक नागिरकाने उतरण्याचे आवाहान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले आहे. त्यानंतर आता रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनमधील खासदारही मैदानात उतरले आहेत. 


रशियन सैन्याने शनिवारी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना खिडक्यांपासून दूर राहून योग्य ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. याबरोबरच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा देश सोडण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देत राजधानीतच राहण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे युक्रेनमधील प्रेत्येक नागरिक आता रशियासोबत लढण्यास तयार झाला आहे. युक्रेनचे खासदार व्योतोस्लाव युराश यांनी आपण शस्त्र हाती घेऊन रस्त्यावर उतरून रशियाच्या सैनिकांशी लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 
 
व्योतोस्लाव युराश हे भारत-युक्रेन फ्रेंडशिप ऑर्गनायझेशनचे प्रमुखही आहेत. काही वर्षे ते कोलकाता येथे वास्तव्यासही होते. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. देशातील महत्त्वाच्या इमारतींजवळ सुरक्षा दलाचे जवान पोझिशन घेत आहेत. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या लष्कराने एका संशयिताला अटक केली आहे.   
 
युक्रेमधील परिस्थिती बिटक झाल्यामुळे युक्रेनची राजधानी किव्हचे महापौर आणि माजी हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन विटाली क्लिट्स्को यांनी आपल्या भावासोबत रशियाविरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विटाली यांचे रशियन आक्रमणापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी मशीन गन लोड करत असतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.  BoxingInsider.com ने शुक्रवारी मशीनगनसह व्हिटाली क्लिट्स्कोचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  या फोटोंना एक कॅप्शनही देण्यात आले आहे. "युक्रेनच्या लष्करी संरक्षणास मदत करण्यासाठी विटाली क्लिट्स्को पूर्णपणे तयार आहे, " असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. 


"व्हिटाली क्लिट्स्को यांनी दावा केला आहे की, सध्याच्या रशियन लष्करी आक्रमणाविरूद्ध ते आपल्या युक्रेनियन मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी लढणार आहेत."  


दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात शेकडो लोक मारले गेले आहेत. शिवाय युक्रेमधील पूल, शाळा आणि अपार्टमेंट इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युक्रेनचे सरकार उलथवून ते आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांचे मत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी विश्वास व्यक्त केला आहे की, युक्रेनचे सैन्य रशियन आक्रमणाचा सामना करेल. 
 
युक्रेनची राजधानी किव्ह येथील रस्त्यावर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी शहर सोडलेले नाही. शिवाय युक्रेनच्या सैनिकांनी शरणागती पत्करल्याचा दावा खोटा आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही तर आमच्या देशाचे रक्षण करेन. युक्रेनची जमीन आमची आहे. हा देश आमचा आहे. आमची मुले आहेत. आम्ही सर्व जण त्यांचे रक्षण करेन." 


महत्वाच्या बातम्या