Russia Ukraine War : युक्रेनने (Ukraine) रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर स्फोट केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. अशा स्थितीत रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने जेपोरिजियावर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशियन हल्ल्यात जेपोरिजिया येथे 3 दिवसांत 34 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी रशियाने निवासी भागांना लक्ष्य करणारी क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा युक्रेनने केला आहे. याबाबत असे सांगण्यात येत आहे की, जेपोरिजिया येथील एका बहुमजली इमारतीवर दहा रशियन क्षेपणास्त्रे पडल्याचे 


पुतिन यांनी आधीच केली होती घोषणा


नुकतेच रशियाने युक्रेनच्या ज्या चार भागांना आपल्या देशात विलीन करण्याची घोषणा केली होती, त्यात जेपोरिजियाचे नावही सामील झाले होते. याव्यतिरिक्त, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 30 सप्टेंबर रोजी युक्रेनच्या लोहान्स्क, डोनेस्तक आणि खेरसनचे रशियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा संबंध क्रिमियामधील पुलावर झालेल्या बॉम्बस्फोटाशी जोडला जात आहे. रशियन मुख्य भूभाग आणि त्याच्या व्यापलेल्या क्रिमियन द्वीपकल्पाला जोडणाऱ्या पुलावर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट झाला. यानंतर आग लागली आणि पुलाचा काही भाग तुटून खाली पडला. यामुळे युक्रेनच्या दक्षिणेकडील भागात लढणाऱ्या रशियन सैन्याचा पुरवठा ठप्प झाला. वृत्तसंस्था अल जझीराच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या इतर मार्गांवर मर्यादित वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.


युक्रेनचे काय म्हणणे आहे?


युक्रेनने म्हटले होते की, ते कोणत्याही किंमतीत आपला प्रदेश रशियाला देणार नाही आणि रशियाच्या सैन्याला त्यांच्यापासून मुक्त करेल. यासोबतच युक्रेननेही नाटो देशांच्या सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या, जेपोरिजियामधील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत अधिक अपडेट येणे बाकी आहे.


युरोपमधील सर्वात मोठा अणु प्रकल्प रशियन सैन्याच्या ताब्यात


जेपोरिझिया येथे युरोपमधील सर्वात मोठा अणु प्रकल्प, जो रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. जेपोरिजिया ही न्यूक्लियर सिटी म्हणून ओळखले जाते. अलीकडे, रशियन-समर्थित स्थानिक फुटीरतावादी नेते आणि अधिकाऱ्यांनी लोहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझिया आणि खेरसन येथे सार्वमत घेतले. 23 ते 27 सप्टेंबर या कालावधीत हे प्रदेश रशियामध्ये विलीन करण्यासाठी सार्वमत घेण्यात आले.