Russia Ukraine War :  युद्ध काळात मदत करताना शत्रू किंवा विरोधक असा कोणताही भेदभाव न करता माणूसकीचं नातं जपायचं असतं. याचीच प्रचिती भारताने दिली असून युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थांनाही भारतीय विद्यार्थ्यांसोबत बाहेर काढलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मराठी मुलांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून या प्रवासात काही पाकिस्तानी विद्यार्थी देखील आहे. या पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी आता भारताचे आभार मानले आहेत.


या बसमध्ये असणारा पाकिस्तानी विद्यार्थी  मोहम्मद सकलेन म्हणाला, आम्ही युक्रेनमधील भारतीय कंत्राटदारांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला येथून बाहेर काढण्यास मदत केली आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, पाकिस्तानी विद्यार्थी कमी आहेत. 


आमच्या दूतवासाने आम्हाला  एका ठिकाणावर पोहचण्यास सांगितले आहे. मी ज्या शहरात राहतो ते शहर अंडर अटॅक आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची साधने पोहचणे शक्य नाही. सुरक्षित ठिकाणी पोहचल्यावर  आम्ही तुम्हाला एअरलिफ्ट करण्यास मदत करू अशी माहिती आमच्या दुतवासाकडून देण्यात आली, असे देखील मोहम्मद या वेळी म्हणाला. 


 युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्या अंतर्गत आज सातवं विमान रोमानियाच्या बुखारेस्ट शहरातून मुंबईत दाखल झालंय. या विमानातून 182 भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. मुंबई विमानतळावर या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. मायदेशी परतताच विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. तर आपल्या लेकरांना पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही विद्यार्थ्यांनी मुंबई विमानतळावरच तिरंगा फडकवला.



महत्त्वाच्या बातम्या: