Russia Ukraine war : रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine war) केल्यापासून जगातील बहुतांश देश रशियावर अनेक निर्बंध लादत आहेत. आर्थिक आघाडी, खेळाचे मैदान, व्यावसायिक संबंध आणि यांसारख्या अनेक संस्थांवरील निर्बंधानंतर आता रशियावर आणखी एक निर्बंध लादण्यात आले आहेत. हा निर्बंध काय हे जाणून तुम्हाला कदाचित थोडं हसू येईल, पण फेडरेशन इंटरनॅशनल फेलीन संस्थेने ही बंदी घातली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय कॅट फॅन्सियर सोसायटी आहे. 


युक्रेनवरील हल्ल्यामुळे निर्णय : 


फेडरेशन इंटरनॅशनल फेलाईनच्या कार्यकारी मंडळाने या संदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला धक्कादायक आहे. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. हजारो लोकांना आपले घर सोडून जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागले आहे. हे लक्षात घेऊन आम्ही काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे."



रशियाच्या बाहेर नोंदणी करू शकत नाही :

 

1 मार्चपासून यापुढे रशियन जातीची एकही मांजर आयात केली जाणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. असे संघटनेने म्हटले आहे. एवढेच नाही तर, आता रशियाबाहेरील फेडरेशनच्या पेडिग्री बुकमध्ये कोणत्याही रशियन मांजराची नोंद होणार नाही.


सध्या 31 मे पर्यंत बंदी : 


संघटनेने आपल्या निर्बंधांनुसार रशियन जातीची कोणतीही मांजर फेडरेशनच्या कोणत्याही शोमध्ये भाग घेऊ शकत नाही असा निर्णय देखील घेतला आहे. हे सर्व निर्बंध 31 मे पर्यंत कायम राहणार आहेत. त्यानंतर बैठक घेतली जाईल आणि गरज पडल्यास त्याचा आढावा घेऊन निर्बंध आणखी वाढवता येतील. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha