Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. कीव्हमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनंतर सर्व नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज सकाळीही कीव्ह आणि खार्किवमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. युद्धाच्या दरम्यान, रशियाने हवाई क्षेत्राचे नियम मोडल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. 


कॅनडाने रशियाच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे, ज्यामध्ये रशिया कॅनेडियन हवाई क्षेत्र वापरू शकत नाही. पण आता एरोफ्लॉट फ्लाइट 111 ने हे निर्बंध तोडून हवाई क्षेत्राचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाकडून गुरूवारी युक्रेनवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर आजही चौथ्या दिवशी दोन्ही देशांमधील हे युद्ध सुरूच आहे.


जगभरातून रशियावर टीका सुरू झाल्यानंतर नाटो देशांनीही रशियाला इशारा दिला आहे. नाटो देशांच्या इशाऱ्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याच्या सूचना देत नाटोला अणुयुद्धाचा इशारा दिला आहे. 


न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याच्या पुतिन यांच्या सूचना


दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांवर जोरदार गोळीबार करत आहेत. यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हे युद्ध आता अणुयुद्धाच्या दिनेने चालले आहे काय? अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha