Russia Ukraine Conflict : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) तणाव आता वाढत आहे. मंगळवारी रशियाने युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, तर बुधवारी अमेरिका आणि इतर अनेक देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले. दरम्यान, बुधवारी युक्रेन सरकारने (Ukraine Government) आपल्या नागरिकांना तातडीने रशिया सोडण्याचे आवाहन केले. या बातमीने तणावात भर पडली आहे. या आवाहनातून अनेक अर्थ काढले जात आहेत.






तातडीने रशिया सोडण्याचे आवाहन


रशियाच्या कारवाईनंतर आता युक्रेनमध्येही कारवाई झाली आहे. युक्रेनने बुधवारी आपल्या नागरिकांना तातडीने रशिया सोडण्याचे आवाहन केले. या बातमीने तणावात भर पडली आहे.


अमेरिका रशियाविरोधात आक्रमक; बायडन यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय


रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धजन्य स्थिती असताना आता अमेरिकेने रशियाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंधाची घोषणा केली आहे. यामुळे रशियाची मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. अमेरिका युक्रेनला लष्करी मदत करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशिया-युक्रेन संकटाच्या मुद्यावर देशाला उद्देशून भाषण केले. बायडन यांनी म्हटले की, डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या प्रांतांची देश म्हणून घोषणा करणे, डोनबासमध्ये शांती सैन्य पाठवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात अमेरिका आर्थिक निर्बंध लागू करत आहे. या आर्थिक निर्बंधामुळे रशिया आता पाश्चिमात्य देशांसोबत व्यापार करू शकत नाही असेही बायडन यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha