India Russia Oil Deal: रशियातील सर्वात मोठी तेल कंपनी रोसनेफ्टने (Rosneft) दोन भारतीय सरकारी तेल कंपन्यांसोबत कच्च्या तेलाचे करार केल्यानंतर माघार घेतली आहे. Rosneft ने आधीच आणखी काही ग्राहकांना तेल पुरवण्याचे आश्वासन दिले आहे आणि आता भारतीय कंपन्यांशी व्यवहार करण्यासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त तेल शिल्लक नाही, यामुळे हे करार रद्द केले असल्याचे कारण देण्यात आले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने बुधवारी एका वृत्तात ही माहिती दिली. भारतीय तेल कंपन्या 24 फेब्रुवारीपासून रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले, त्यानंतर पाश्चात्य देशांनी त्यावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली.


एक अहवालानुसार, रोझनेफ्टसोबत नवीन करार न झाल्यास, भारतीय कंपन्यांना आगामी काळात स्पॉट मार्केटमधून जास्त किंमतीवर तेल खरेदी करण्याचा विचार करावा लागू शकतो. तसेच यातून हे देखील कळते की, पाश्चिमात्य देशांच्या सर्व निर्बंधांना न जुमानता, रशिया अद्याप इतर देशांना यशस्वीरित्या तेल विकत आहे.


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या तीन भारतीय सरकारी मालकीच्या कंपन्यांनी परवडणाऱ्या किमतीत 6 महिन्यांच्या पुरवठा करारासाठी Rosneft सोबत चर्चा सुरू केली होती. या तिघांपैकी फक्त इंडियन ऑइलने रोझनेफ्टशी करार केला आहे. या करारांतर्गत इंडियन ऑल दर महिन्याला 6 दशलक्ष बॅरल तेल खरेदी करेल आणि गरज पडल्यास 3 दशलक्ष बॅरल अतिरिक्त खरेदी करण्याचीही तरतूद आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, रोझनेफ्टने इतर दोन भारतीय कंपन्यांच्या विनंत्या नाकारल्या आहेत. दरम्यान, यावर अद्याप रोझनेफ्ट, आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crude Oil : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या, भारताला महागाईचा दणका आणखी बसणार


Russia - Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाचे 100 दिवस! संपूर्ण जगासह भारतालाही मोजावी लागली मोठी किंमत?